प्रताप महाडिक।डेगाव : पावसाने दडी मारल्यामुळे कडेगाव तालुक्यातील खरिपाची पिके करपून गेली होती. खरीप पीक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. रब्बी हंगामही धोक्यात आहे. असे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. शासनाने प्रारंभी दुष्काळसदृश तालुक्यांच्या यादीत तसेच पहिली कळ लागू झालेल्या व त्यानंतर दुसरी कळ लागू झालेल्या तालुक्यांच्या यादीत कडेगाव तालुक्याचा समावेश केला होता. परंतु बुधवारी जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत कडेगाव तालुक्याचे नाव नसल्याचे समजताच येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे गावोगावी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे .कडेगाव तालुका आता दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून बाहेर गेला आहे. यामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकºयांना मिळणार नाही, यासाठी तातडीने कडेगाव तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.कडेगाव तालुक्यात ५० टक्क्यांहून अधिक शेतजमीन कोरडवाहू आहे. या शेतजमिनीला ताकारी किंवा टेंभू योजनेचे पाणी मिळत नाही.प्रशासनाने २२ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधित ज्वारी, बाजरी, भुईमूग, मका व भात या पाच प्रमुख पिकांची कापणी प्रयोग घेण्यात आले. हे प्रयोग कोणत्या शिवारात घेतले, यावर उत्पादकतेचे प्रमाण अवलंबून होते. कडेगाव तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे दुष्काळाच्या छायेतील तालुक्यांमध्ये कडेगाव तालुक्याचा समावेश झाला होता. परतीचा पाऊसही अत्यल्प प्रमाणात झाला आहे. रब्बी हंगामही घोक्यात आहे. कडेगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. कडेगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.राजकीय : नेत्यांवर भिस्तकडेगाव तालुका दुष्काळसदृश, गंभीर दुष्काळाची पहिली कळ, दुसरी कळ या सर्व याद्यांमध्ये समाविष्ट होता; मात्र शासनाने जाहीर केलेल्या अंतिम यादीतून वगळला. यावर कॉँग्रेस नेते आमदार मोहनराव कदम व आमदार डॉ. विश्वजित कदम संघर्षाची भूमिका घेणार का? भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख स्वपक्षातील नेत्यांकडे तालुक्याची व्यथा मांडणार का? यावर हवालदिल शेतकºयांची भिस्त आहे.
दुष्काळग्रस्तांच्या यादीतून कडेगाव तालुका आऊट खरिपाची पिके करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 12:50 AM
पावसाने दडी मारल्यामुळे कडेगाव तालुक्यातील खरिपाची पिके करपून गेली होती. खरीप पीक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. रब्बी हंगामही धोक्यात आहे. असे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे.
ठळक मुद्देउत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घटकडेगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत