शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
2
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
3
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
4
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
5
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
6
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
7
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
8
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
10
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
11
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
12
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
13
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
14
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
15
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
16
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
17
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
18
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
19
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
20
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."

गदिमांच्या स्मारकासाठी साहित्यिकांनी उगारली शब्दांची अस्त्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 5:51 PM

G D Madgulkar, Sangli, culture मराठी साहित्यातील आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकासाठी साहित्यिक, कलावंत आणि रसिकांतर्फे आगळेवेगळे जनआंदोलन करण्यात येणार आहे. गदिमांच्या ४३ व्या स्मृतिदिनी सोमवारी ( दि. १४) सांगलीत गदिमांच्या काव्याचा जागर केला जाणार आहे. राज्यभरात तसेच बृहन्महाराष्ट्र आणि परदेशातील रसिकही त्यामध्ये सहभागी होतील.

ठळक मुद्देगदिमांच्या स्मारकासाठी साहित्यिकांनी उगारली शब्दांची अस्त्रेसांगलीत सोमवारी गदिमांच्या काव्याचा ४३ व्या स्मृतिदिनी जागर

सांगली : मराठी साहित्यातील आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकासाठी साहित्यिक, कलावंत आणि रसिकांतर्फे आगळेवेगळे जनआंदोलन करण्यात येणार आहे. गदिमांच्या ४३ व्या स्मृतिदिनी सोमवारी ( दि. १४) सांगलीत गदिमांच्या काव्याचा जागर केला जाणार आहे. राज्यभरात तसेच बृहन्महाराष्ट्र आणि परदेशातील रसिकही त्यामध्ये सहभागी होतील.गदिमा स्मारक जनआंदोलन समितीच्या प्राथमिक बैठकीत याचे नियोजन झाले. प्रा. भीमराव धुळूबुळू, महेश कराडकर आणि अभिजित पाटील यांनी ही माहिती दिली. गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षात स्मारक उभारण्याची घोषणा शासनाने केली होती, प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याची शासनाला आठवण करुन देण्यासाठी साहित्यिकांनी शब्दांचीच अस्त्रे उगारली आहेत.कोणत्याही घोषणाबाजीशिवाय व शासन किंवा राजकीय पक्षांचा निषेध टाळून आंदोलन केले जाईल. गदिमांच्या कविता आणि गीतांचे वाचन करून शासनाचे लक्ष वेधले जाईल. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तेथील साहित्यिक हे अनोखे आंदोलन करतील. गोवा, भोपाळ आणि बेंगलोर येथेही आंदोलन होईल. त्याशिवाय अमेरिका, इंग्लंड, म्यानमार, नेदरलँड आणि इटली या देशातील मराठी बांधवही आपापल्या परिसरात गदिमांच्या कविता व गीतांचा जागर करतील. आंदोलनाच्या तयारीच्या बैठकीत परदेशी मराठी बांधवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्रारा सहभाग नोंदविला. पुण्यातील गझलकार प्रदीप निफाडकर यांनी त्याचे संयोजन केले.गदिमांचे मूळ गाव माडगूळ हे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्‍यात आहे. शेटफळे हे जन्मगावदेखील आटपाडी तालुक्यातच आहे. त्यामुळे देशविदेशातील या आंदोलनात सांगलीकरांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच्या तयारीच्या बैठकीला धुळूबुळू, कराडकर व पाटील यांच्यासह डॉ. अनिल मडके, दयासागर बन्ने, नामदेव भोसले, अर्चना मुळे, प्रा. संतोष काळे, वर्षा चोगुले, गौतम कांबळे, वंदना हुळबत्ते आदी उपस्थित होते.

टॅग्स :G D Madgulkarग. दि. माडगूळकरSangliसांगलीcultureसांस्कृतिक