शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
2
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
3
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
4
IND vs PAK: टॉस जिंकून पहिली बॅटिंग की बॉलिंग? भारत-पाकिस्तान मॅचसाठी कसं असेल पिच?
5
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
6
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
7
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
8
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
9
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
10
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
11
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
12
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
13
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
14
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
15
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
16
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
17
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
18
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
19
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
20
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?

राज्यात पशुधन घटतेय, पशुगणना अहवाल प्रसिद्ध

By अशोक डोंबाळे | Published: December 07, 2023 12:22 PM

गायी-बैलांसह घोडा, गाढव, वराहांच्या संख्येत घट

अशोक डोंबाळेसांगली : राज्यात पशुसंवर्धन विभागातर्फे पाळीव पशूंच्या गणनेचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या पाच वर्षांतील दुष्काळी परिस्थितीसह इतर कारणांमुळे २०१२ च्या तुलनेत राज्यात गायी-बैलांची संख्या ९.५४ टक्के घटली आहे. तसेच घोडा, गाढव, वराहांच्या संख्येत ३८ ते ४८ टक्क्यांपर्यंत घट आहे. या संबंधीचा अहवाल राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने प्रसिद्ध केला आहे.शासनातर्फे दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. २०१९ मध्ये सुरू केलेली पशुगणना पूर्ण झाली असून, नोव्हेंबर २०२३ मध्ये अंतिम अहवाल प्रसिद्ध झाला आहे. २०१२ मध्ये राज्यात गायी-बैलांची ग्रामीणमध्ये १ कोटी ५० लाख ८९ हजार ६५५ संख्या होती. २०१९ च्या पशुगणनेत ९.५४ टक्के घट होऊन १ कोटी ३६ लाख ४९ हजार १९५ झाली आहे. शहरात सर्वाधिक १३.०३ टक्क्यांनी घट आहे. ग्रामीणमध्ये ०.७३ टक्क्यांनी म्हशींची संख्या वाढली आहे. शहरामध्ये ७.६० टक्क्यांनी घट झाली आहे. ग्रामीण भागात मेंढ्यांची संख्या ४.०२ टक्क्यांनी वाढली असून, शहरात ४.३१ टक्क्यांनी घट आहे.शेळ्यांची संख्या ग्रामीणमध्ये २७.७३ टक्क्यांनी वाढली असून, शहरात ८.९० टक्क्यांनी घटली आहे. घोड्यांची संख्या ग्रामीणमध्ये ४८.२६ टक्क्यांनी, तर शहरात ५४.३९ टक्क्यांनी घटली आहे. खेचरची ग्रामीणमध्ये ८७.०२ टक्के घट, तर शहरात २३८८.२४ टक्के वाढ झाली आहे. गाढवांची संख्या ग्रामीणमध्ये ३८.२३ टक्के, तर शहरात ४३.८६ टक्के घट झाली आहे. वराहांची संख्या ग्रामीणमध्ये ४८.८३ टक्के, तर शहरात ५४.९३ टक्के घट आहे. श्वानांची संख्या ग्रामीणमध्ये ३४.४५ टक्क्यांनी घटली असून, शहरात २१.९९ टक्के वाढ झाली आहे. कोंबड्यांची संख्या ग्रामीणमध्ये ३.८५ टक्के घट, तर शहरात २७.६५ टक्के घट आहे.महाराष्ट्रात उंटांची संख्या वाढलीवाळवंटाचा राजा म्हणून ओळख असलेल्या उंटांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्राची मान उंच राहिली आहे. महाराष्ट्रात २०१२ च्या पशुगणनेत ग्रामीण भागात ११६ उंट होते. यामध्ये दुप्पट वाढ होऊन २०१९ च्या पशुगणनेत ३०० संख्या झाली आहे. २५८.६२ टक्क्यांनी उंटांची संख्या वाढली आहे. तीच परिस्थिती शहरी भागातही आहे. शहरात पूर्वी ६६ उंट असून, त्यात वाढ होऊन १६५ झाले आहेत. शहरातही १५० टक्क्यांनी उंट वाढले आहेत.

पाळीव प्राण्यांची ग्रामीणची संख्या                २०१२   -   २०१९ टक्के   - वाढ/घटगाय-बैल - १५०८९६५५ - १३६४९१९५ - ९.५४ घटम्हैस   - ५२०९९९४ -  ५२४८५२८  - ०.७३ वाढमेंढी - २५३३९६१  - २६३५९१३ -  ४.०२ वाढशेळ्या - ७९७१८४२ - १०१८२६८६ - २७.७३ वाढघोडा - ३०७८१ - १५९२५ - ४८.२६ घटखेचर - १९८८ - २५८  - ८७.०२ घटगाढव - २१६०५ - १३३४५ - ३८.२३ घटउंट - ११६  - ३०० - १५८.६२ वाढवराह - २३२६८३ - ११९०६० - ४८.८३ घटश्वान - १०७७८५६ - ७०६४९२ - ३४.४५ घटकोंबड्या - ७५६९६१२० - ७२७७९५४० - ३.८५ घट

टॅग्स :Sangliसांगली