शेतकऱ्यांना मिळतेय मार्गदर्शन
सांगली : कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घरगुती सोयाबीनची उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक दाखविले जात आहे. यासाठी मंडल अधिकारी व कृषी सहायक हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले
ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह संख्या वाढली
सांगली : चाचण्या वाढविण्यात आल्याने काेराेना अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. अनेकजण गावात फिरल्यानंतर त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह येत आहे. त्यामुळे अशा रुग्णांना प्रतिबंध घालण्याची गरज आहे़
वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
सांगली : जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांच्या लगतची वृक्षतोड मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान हाेण्याची भीती आहे. अनेकजण झाडांच्या बुंध्याला आग लावून दुसऱ्यादिवशी त्याची विल्हेवाट लावत असल्याचे चित्र आहे.
अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त दुकाने सुरू
सांगली : काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गंत कडक निर्बंध लावले आहेत. जीवनाश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र, ग्रामीण भागामध्ये अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्तही अन्य दुकाने सुरू ठेवण्यात येत असल्याने संचारबंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागात व्यवसाय लाॅकडाऊन
सांगली : कोरोनाच्या सावटामुळे ग्रामीण भागात हातावर पोट भरणाऱ्या लहान व्यावसायिकांचे गेल्या काही दिवसांपासून खूप हाल हाेत आहेत. मंदीमुळे आर्थिक आवक कमी झाल्याने अनेकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आता कठीण झाले आहे.
कोरोनामुळे नागरिकांची शेतीकडे धाव
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असल्याने व संसर्गाच्या भीतीने नागरिक शेतातच मुक्काम करीत असल्याचे चित्र आहे. शेतातील वातावरण प्रसन्न असते. या ठिकाणी संसर्गाचा धोका नसल्याने नागरिकांनी शेताकडे धाव घेतली आहे.
पाणंद रस्ते अर्धवट
पलूस : तालुक्यातील शेतात जाणाऱ्या पाणंद रस्त्याची कामे रखडली आहेत. पाणंद रस्ते योजनाच थंडबस्त्यात आहे. विकासाचा निधी कमी झाल्याने, शेताच्या वहिवाटीच्या रस्ते निर्मितीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच
करगणी : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सातत्याने विजेच्या लपंडावामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. विद्युत उपकरणेही निकामी होत आहेत. बऱ्याच गावांमध्ये पूर्ण दाबाने वीजपुरवठा मिळत नाही. सातत्याने तक्रारी वाढत आहेत.
शासनाच्या विविध योजना कागदावरच
सांगली : कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे विविध योजना पोहोचविताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. राज्य व केंद्र शासनाने शेतीसाठी अनेक योजना सुरू केल्या. जिल्हा परिषदेच्याही योजना आहेत, पण या योजना कागदावरच आहेत.
पावसाळ्यापूर्वी मशागतीला वेग
करगणी : कोरोनाचे संकट डोक्यावर ठेवून शेतकरी भरउन्हात बैलजोडी व ट्रॅक्टरच्या साह्याने शेती मशागत करीत आहेत. काही ठिकाणी पाणी पातळी खालावल्याने पाणी टंचाई भासू लागली आहे. हातपंप आटल्याने ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.