शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

‘वसंतदादा’च्या कार्यालयास कुलूप

By admin | Published: February 03, 2017 1:02 AM

कामगारांत खळबळ; ले-आॅफसाठी कुलूप लावल्याचा आरोप

सांगली : येथील वसंतदादा साखर कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह टाईम कार्यालय गुरुवारी कुलूपबंद होते. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच कामगारांत खळबळ उडाली. कामगारांच्या ‘ले-आॅफ’साठी कारखान्याच्या कार्यालयास कुलूप लावल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला, तर कुलूप न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा साखर कामगार युनियनने दिला आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील मुख्य प्रशासकीय इमारत व टाईम कार्यालयात सकाळी नेहमीप्रमाणे कामगार आले. मात्र, कार्यालयाला कुलूप असल्याने त्यांच्यात खळबळ उडाली. याबाबत कामगारांनी अधिक चौकशी केली; पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाच्या विवाहासाठी कार्यालय बंद ठेवल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. दुपारनंतर कामगारांनी ले-आॅफ घ्यावा, यासाठी कुलूप लावल्याची चर्चा होती. सकाळपासून कामगार मुख्य इमारतीबाहेर ठाण मांडून होते. कामगार युनियनचे सरचिटणीस प्रदीप शिंदे यांनी कामगारांशी चर्चा केली. त्यानंतर अध्यक्ष विशाल पाटील यांची भेट घेऊन कुलूप काढण्याची मागणी केली. सध्या कारखान्यात कायमस्वरूपी व हंगामी असे ९५५ कामगार आहेत. गळीत हंगामाची सांगता झाल्याने कायमस्वरूपी ४५५ कामगार कार्यरत आहेत. यंदा कारखान्याने केवळ एक लाख टन गाळप केले आहे. गाळपच न झाल्याने भविष्यात कामगारांचा खर्च कारखान्याला न पेलणारा आहे. त्यासाठी कामगारांनी ले-आॅफ घ्यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील व संचालकांनी कामगार युनियनशीही त्यासंदर्भात चर्चा केली आहे. कामगारांच्या ले-आॅफला शेतकरी संघटनेचा विरोध आहे, तर कारखान्यातील कामगार युनियनकडून कायदेशीर ले-आॅफ घेण्याबाबत विचारविनियम सुरू असल्याचे समजते. कामगारांनी बेकायदेशीर ले-आॅफ घ्यावा, यासाठी अध्यक्षांनी कुलूप लावले आहे. कारखाना बंद पाडण्याचा डाव आहे, असा गंभीर आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केला. याबाबत सहकारमंत्री, साखर आयुक्त, कामगार आयुक्तांशी संपर्क साधून तक्रार केल्याचे फराटे यांनी सांगितले. वसंतदादा कारखान्याचे गाळप यंदा कमी झाले आहे. त्यामुळे कामगारांच्या पगाराचा बोजा कारखान्यावर पडणार आहे. कामगारांनी ले-आॅफ घ्यावा, यासाठी कामगार युनियनशी चर्चा सुरू आहे. त्यातून सकारात्मक तोडगा समोर येईल. कारखान्याच्या इमारतीला कुलूप लावले आहे. तो कारखाना संचालक व कामगारांचा अंतर्गत प्रश्न आहे. - विशाल पाटील, अध्यक्ष, वसंतदादा साखर कारखानावसंतदादा कारखान्यातील कामगारांची थकीत देणी दिल्याशिवाय ले-आॅफ देता येणार नाही. त्यामुळे ले-आॅफला आमचा विरोध आहे. कुलूप लावल्याबाबत आम्ही सहकारमंत्री, साखर आयुक्त, कामगार आयुक्तांकडे तक्रार केली आहे. शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. - सुनील फराटे, जिल्हाध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष