शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

Lok Sabha Election 2019 वसंतदादांच्या नातवामागे राजारामबापूंचा पुत्र : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 11:30 PM

वसंतदादा पाटील व राजारामबापू पाटील यांच्यात तात्त्विक वाद होते. त्यामुळे जुन्या गोष्टींचा विचार करून राजकारणात पुढे जाता येत नाही. त्यामुळे विशाल पाटील यांनी त्या गोष्टीचा विचार करू नये. लोकसभेच्या निवडणुकीत वसंतदादांच्या नातवामागे राजारामबापूंचा

ठळक मुद्देदादा-बापू वादावरून रंगली प्रचार सभा;एकसंधपणे लढण्याचा घटकपक्षांचा निर्धार

सांगली : वसंतदादा पाटील व राजारामबापू पाटील यांच्यात तात्त्विक वाद होते. त्यामुळे जुन्या गोष्टींचा विचार करून राजकारणात पुढे जाता येत नाही. त्यामुळे विशाल पाटील यांनी त्या गोष्टीचा विचार करू नये. लोकसभेच्या निवडणुकीत वसंतदादांच्या नातवामागे राजारामबापूंचा पुत्र ताकदीने उभा आहे, असे प्रतिपादन राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केले.सांगलीच्या स्टेशन चौकात वसंतदादा स्मारकासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार व वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्या प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी झाला. यावेळी ते बोलत होते. सभेत अनेक वक्त्यांनी दादा-बापू वादाचा विषय उपस्थित केला. त्यावरून विशाल पाटील आणि जयंत पाटील यांनी राजकीय टोलेबाजी केली.

जयंत पाटील म्हणाले की, मागच्या गोष्टींचा विचार करून कधीही राजकारणात पुढे जाता येत नाही. पुढचा विचार करून जो राजकारण करतो, तोच पुढे जात असतो. त्यामुळे विशाल पाटील यांनी वसंतदादा व राजारामबापू असा भेद मनात बाळगू नये. वसंतदादांच्या ताटात मी जेवलो आहे. वसंतदादांच्या जिल्ह्यातील सर्वात लाडका कार्यकर्ता मीच होतो. आयुष्यातील अनेक क्षण त्यांच्यासोबत घालविले आहेत. दादा व बापू यांच्यात तात्त्विक मतभेद होते. ते कधीही एकमेकांशी वैयक्तिक राग बाळगत नव्हते. बाहेरील लोक आक्रमण करू लागले की, दादा-बापू एक होत असत. आताही काही बाहेरचे लोक शहाणपणा शिकवू पाहत आहेत. त्यामुळे आपण एकत्र येण्याची गरज आहे. आपल्यातील वादाचे नंतर पाहू. विशाल पाटील, प्रतीक पाटील, शैलजाभाभी पाटील आणि मी स्वत: बसून मागील विषयांचे काय करायचे ते ठरवू. कार्यकर्त्यांनी या गोष्टीचा विचार करू नये.

विशाल पाटील म्हणाले की, दादा-बापू हा वाद आता संपुष्टात आला पाहिजे. लोकसभेची यंदाची निवडणूक या वादावर पडदा टाकणारीच आहे. माझी चूक मी मान्य करतो. आता वडीलधारे म्हणून जयंत पाटील यांनी माझ्यामागे उभे राहावे. विश्वजित कदम यांनीही मला सांभाळून घ्यावे.आ.विश्वजित कदम म्हणाले की, कदम-दादा गट असाही वाद विनाकारण निर्माण केला जातो. वास्तविक पतंगराव कदम कधीच मनात काही ठेवायचे नाहीत. मनात असेल ते बोलून मोकळे होत असत. आमचेही मन तसेच आहे. आमच्याबद्दलचे गैरसमज दूर झाल्याने आनंद वाटला. विशाल पाटील यांची चूक मान्य करण्याची पद्धत कौतुकास्पद आहे. त्यांना जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्य पलूस-कडेगाव मतदार संघातून देण्यात येईल. पण बॅटिंग करताना मैदानात दोन बॅटस्मन असतात, हे लक्षात असू द्या. एक गेला की दुसरा व दुसरा गेला की तिसरा येतो. त्यामुळे आपल्यालाच मिळाले तरच काँग्रेसमध्ये राहू, असा विचार त्यांनी करू नये.

प्रकाश आवाडे, सदाशिवराव पाटील यांनीही, आपसातील गैरसमज दूर करून पुढे गेल्यास ही निवडणूक अवघड नाही, असे मत मांडले. यावेळी खासदार राजू शेट्टी, आ. सुमनताई पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, पी. एन. पाटील, जयश्रीताई पाटील, अरुण लाड, सत्यजित देशमुख, शैलजाभाभी पाटील, डॉ. भारत पाटणकर, अ‍ॅड. अजित सूर्यवंशी, नामदेवराव मोहिते, सुरेश पाटील, अविनाशकाका पाटील, संजय बजाज, मनोज शिंदे, कमलाकर पाटील, पद्माकर जगदाळे, ताजुद्दीन तांबोळी, जितेश कदम, उत्कर्ष खाडे, डॉ. नामदेव कस्तुरे, महेश खराडे उपस्थित होते.कमरेला पिस्तूल : म्हणजे धाडस नव्हे!खासदार संजयकाका पाटील यांनी काही दिवसांपूर्वी विशाल पाटील यांना उद्देशून, ‘संग पाहिला आता जंग पाहा’, असे आव्हान दिले होते. त्याचा समाचार घेत विशाल पाटील म्हणाले, कमरेला पिस्तूल लावून दादागिरी करण्याला धाडस म्हणत नाहीत. आ. सुमनताई पाटील यांच्यासारख्या महिलेला घरात कोंडून दगडफेक करून तुम्ही तुमची मर्दानगी दाखविली आहे. तुमची दादागिरी आम्ही तासगावात येऊन मोडू. तुम्ही माझ्या आडवे येऊ नका. वसंतदादांच्या प्रेमाची ताकद आमच्यात अजूनही अबाधित आहे. 

संजयकाका सर्व महाराजांना भेटून आले!मला उमेदवारी मिळू नये म्हणून राज्यातल्या सर्व महाराजांना संजयकाका पाटील यांनी भेटून साकडे घातले. केवळ राजू शेट्टींना ते भेटले नाहीत. म्हणून त्यांनी मला उमेदवारी दिली, असा टोला विशाल पाटील यांनी लगावला. 

साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखलविशाल पाटील यांनी राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार राजू शेट्टी, आ. सुमनताई पाटील, आ. विश्वजित कदम यांच्यासमवेत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यांनी शक्तिप्रदर्शन न करता साधेपणाने अर्ज दाखल केला.सांगलीतील प्रचार सभेत बॅट उंचावून नेत्यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला. यावेळी डावीकडून सुरेश पाटील, जयश्रीताई पाटील, आ. सुमनताई पाटील, आ. जयंत पाटील, खासदार राजू शेट्टी, आ. विश्वजित कदम, अरुण लाड, विशाल पाटील, सदाशिवराव पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :sangli-pcसांगलीPoliticsराजकारणElectionनिवडणूक