Lok Sabha Election Exit Poll Results 2024 ( Marathi News ): लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत होता. या मतदारसंघावर महाराष्ट्राचे लक्ष आहे. या मतदारसंघात चुरशीची लढत झाली असून आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.
सांगली लोकसभेतील मतदान संपल्यानंतर अनेकांनी विजयाचे दावे केले होते. अनेकांनी तिन्ही उमेदवारांच्या विजयाचे दावे केले होते. दरम्यान आता एक्झिट पोलचे अंदाज समोर येण्यास सुरूवात झाली आहे.
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
सांगली लोकसभा मतदारसंघ
सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ही जागा ठाकरे गटाला सोडली. ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसच्याविशाल पाटील यांनी बंडखोरी करत ही निवडणूक अपक्ष लढवली तर भाजपाकडून संजयकाका पाटील यांनी निवडणूक लढवली. दरम्यान, आता निकालाआधी एक्झिट पोल समोर आले आहेत. टीव्ही नाईनच्या एक्झिट पोलनुसार, सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील आघाडीवर असल्याचे दाखवण्यात आले आहे.
महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी
महाराष्ट्रात यंदाची लोकसभा निवडणूक ऐतिहासिक ठरली. कारण राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार, याकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. पक्षफुटीची सहानुभूती महाविकास आघाडीला मिळेल, तर संघटनात्मक ताकदीचा फायदा महायुतीला होईल, असं बोललं जात होतं. एक्झिट पोलच्या अंदाजातही याचं प्रतिबिंब दिसत असून राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरशीची लढत झाली आहे.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण जागा - ४८भाजप - १७एकनाथ शिंदे यांची शिवसेना - ६ अजित पवार यांची राष्ट्रवादी - १
काँग्रेस - ८शरद पवार यांची राष्ट्रवादी - ६ उद्धव ठाकरे यांची शिवसेना - ९ इतर - १