शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पलूस-कडेगावच्या संग्रामात लोकसभेची पेरणी -- कारण -राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:39 AM

जिल्ह्यात एकीकडं महापालिका निवडणुकीचा माहोल तयार होतोय, तर दुसरीकडं विधानसभेच्या पलूस-कडेगाव मतदारसंघात घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींमुळं तर्कवितर्कांचं मोहोळ घोंघावू लागलंय

-श्रीनिवास नागेसांगली जिल्ह्यात एकीकडं महापालिका निवडणुकीचा माहोल तयार होतोय, तर दुसरीकडं विधानसभेच्या पलूस-कडेगाव मतदारसंघात घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींमुळं तर्कवितर्कांचं मोहोळ घोंघावू लागलंय. तिथल्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी भाजपनं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचं नाव पुढं करण्याची चाल खेळली आणि नव्या समीकरणांचा पट मांडला जाण्याचे स्पष्ट संकेत मिळाले.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या आकस्मिक निधनानंतर पलूस-कडेगाव मतदारसंघात काय होणार, असं वाटत असतानाच त्यांचे चिरंजीव विश्वजित यांना तेथून बिनविरोध निवडून द्यावं, असा मतप्रवाह पुढं आला. पतंगरावांचं अकाली निधन झाल्यानं विश्वजित यांच्यामागं सहानुभूती आहे. शिवाय विधानसभेच्या निवडणुकीला वर्षभराचाच कालावधी उरला आहे. त्यामुळं काँग्रेसविरोधात सर्व पक्ष सबुरीनं घेतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.

त्याप्रमाणं राष्टÑवादीनं उमेदवार न देण्याचं जाहीर केलं, पण बिनविरोधच्या चर्चेला भाजपनं खोडा घातला. १९९७ मध्ये तिथं तत्कालीन आमदार संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत संपतरावांचे पुतणे आणि आताचे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख रिंगणात उतरले होते. मात्र त्यावेळी पतंगराव कदम यांनी निवडणूक बिनविरोध होऊ दिली नव्हती. त्यांनी स्वत: देशमुखांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ती सल देशमुखांना होती. त्यामुळंच आता कशासाठी कदम यांना ‘बाय’ द्यायचा, असा सवाल करून देशमुखांनी भाजपला निवडणूक लढवण्यास भाग पाडलंय. पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी भाजपचे नेते यावेळी थांबतील, असा होरा खोटा ठरतोय.

भाजप निवडणूक लढवणार, हे निश्चित होताना, उमेदवार कोण याची चर्चा जोरात सुरू झाली. कदम यांचे कट्टर विरोधक पृथ्वीराज देशमुख स्वत:च उतरतील, असं वाटत असतानाच भाजपनं धक्का दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काहीसं अनपेक्षितरित्या संग्रामसिंहांचं नाव पुढं केलं. संग्रामसिंह हे टेंभू योजनेचे जनक म्हणून ओळखल्या जाणाºया संपतराव देशमुखांचे चिरंजीव. सध्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आणि जिल्हा बँकेचं उपाध्यक्षपद सांभाळताहेत. कडेगावच्या पलीकडं खटाव तालुक्यात गोपूज इथं त्यांनी खासगी साखर कारखाना उभारलाय.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम विरुद्ध जिल्हा परिषदेचं अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख अशी तगडी लढत इथं होऊ शकते. कदम आणि देशमुख घराण्यातली ही धाकटी पाती एकमेकांविरोधात उभी ठाकणार आहेत. काँग्रेस आणि भाजपसोबत कदम आणि देशमुख या दोन घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे... पण त्यासोबत नव्या राजकीय समीकरणांचा पटही मांडला जाणार आहे.

विधानसभेसाठी पृथ्वीराज देशमुखांनी स्वत: न उतरता संग्रामसिंहांचं नाव पुढं आणलंय. आता त्यांची पुढची चाल काय असेल, या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या आणि खासदार संजयकाका पाटील यांच्यातील संघर्षात दडलंय.संजयकाका पक्षाचे खासदार आणि देशमुख जिल्हाध्यक्ष असूनही दोघांतून विस्तव जात नाही. दोघे एकमेकांची जिरवण्याची एकही संधी सोडत नाहीत. संजयकाका आणि महसूलमंत्री तथा माजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे तर विळ्याभोपळ्याचे सख्य. दादाही काकांच्या खच्चीकरणावर मेहनत घेताना दिसतात. महापालिका निवडणुकीत भाजपची सूत्रं आमदार सुधीर गाडगीळांना देताना काकांना मुद्दाम डावलणं, तासगावातील भाजप-राष्ट्रवादीच्या हाणामारीत काकांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकरवी चाप बसवणं, असे फण्डे दादा वापरत असतात. काकांचं खासदारकीचं तिकीट कापायचं, असा चंगच त्यांनी बांधलाय. काकांना डावलून पृथ्वीराज देशमुखांना लोकसभेसाठी उतरवायचा डाव त्यांनी आखलाय. चालून आलेली ही संधी सोडण्यास देशमुख थोडेच साधूसंत आहेत!

जाता-जाता : संजयकाका पाटील खासदार असले तरी ते दिल्लीत म्हणावे तसे रमलेले नाहीत. त्यांना विधानसभा आणि मंत्रालय खुणावतंय. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या निकट जाण्याचा प्रयत्न सातत्यानं चालवलाय. काकांच्या नंतर राजकारणात आलेले बरेचजण मंत्री झालेत. मात्र आक्रमकता, संघर्षाची तयारी, अनुभव, राजकारणातील नेमक्या संधीचा अचूक अभ्यास ही वैशिष्ट्यं असूनही मंत्री व्हायचं त्यांना जमलेलं नाही. ही सुप्त इच्छा आपोआप फळास येण्याचा मार्ग खुला होताना काका आता विरोध करतील की गप्प राहतील..?

 

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण