शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

चिन्हांचा ‘लोच्या’, गावोगावी आघाड्यांचे पेव--वाळवा तालुक्यात पक्ष बासनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 10:31 PM

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील धुमशानला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्दे मनोमीलन औटघटकेचे; उमेदवारांवर स्वतंत्रपणे प्रचार करण्याची वेळ

युनूस शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : वाळवा तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील धुमशानला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांनी स्थानिक पातळीवर आघाडी करून लढण्याचा अधिकार कार्यकर्त्यांना दिला आहे. आ. जयंत पाटील समर्थकांचे मोठ्या गावातील मनोमीलन औटघटकेचे ठरल्याने गटा-गटाने स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली आहे.

राज्यातील सत्ताबदल, सदाभाऊ खोत यांच्या रूपाने तालुक्याला मिळालेले मंत्रीपद, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी धाडसाने घडवलेले सत्तांतर यातून राजकीय वातावरण ढवळून गेले आहे. सत्तेची ताकद मिळाल्याने भाजप, सेना, रयत क्रांती संघटनेसह महाडिक, नायकवडी गटाच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. प्रस्थापित जयंत पाटील समर्थकांच्या गटा-तटातील वादाचा लाभ विरोधक कितपत उठवतातल यावर विधानसभेचा आखाडा गाजणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीतील स्थानिक आघाड्या नोंदणीकृत नाहीत. सरपंचपदाच्या उमेदवाराला एक चिन्ह, तर प्रभागात लढणाºया उमेदवारांना वेगळी चिन्हे मिळाली आहेत. एका प्रभागात सत्ताधाºयांना मिळालेले चिन्ह दुसºया प्रभागातील विरोधकांना मिळाले आहे. त्यामुळे प्रचार करताना उमेदवारांची तर मतदान करताना मतदारांची कसोटी लागणार आहे. तालुक्यात ७ ते ९ सदस्य संख्येच्या ५३ ग्रामपंचायती आहेत. ११ सदस्य संख्येची १०, तर १३ ते १५ सदस्य संख्येची १३ गावे आहेत. तर १७ ते १८ सदस्य असणाºया १२ गावांतून संघर्ष सुरू झाला आहे. सरपंचपदासाठी २८ ठिकाणी दुरंगी, २८ जागी तिरंगी, तर १३ गामपंचायतीत चौरंगी लढती होत आहेत. ८ गावात पंचरंगी सामना रंगणार आहे.

वाळवा, ऐतवडे खुर्द, येडेनिपाणी, पेठ, ताकारी, बागणी, शिगाव, बावची, गोटखिंडी, वाटेगाव, नेर्ले, कोरेगाव, कामेरी, साखराळे, बोरगाव अशा गावांतून लक्षवेधी लढतीचे संकेत मिळत आहेत. वाळव्यात हुतात्मा गट विरुध्द राष्ट्रवादी, ऐतवडे खुर्दमध्ये काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादीचे विखुरलेले गट, पेठमध्ये महाडिक विरुध्द राष्ट्रवादी, ताकारीत राष्ट्रवादी विरुध्द सर्व पक्ष, शिगावात राष्ट्रवादीचे दोन गट विरुध्द शिंदे समर्थक स्वरुप पाटील गट, गोटखिंडीत राष्ट्रवादीचे दोन गट आणि हुतात्मा समर्थक अशी तिहेरी लढत, साखराळेत जयंत पाटील व शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील एकत्रित विरुध्द इतर पक्ष, कोरेगावात महाडिक विरुध्द राष्ट्रवादी, बोरगावात काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादी समर्थक, कामेरीत आमदार नाईक, सी. बी. पाटील, दि. बा. पाटील समर्थक विरुध्द सुनील पाटील, रणजित पाटील गट, वाटेगावात बर्डे विरुध्द पाटील, बागणीत राष्ट्रवादी समर्थक विरुध्द शिंदे समर्थक अशा हाय व्होल्टेज लढती रंगणार आहेत.तीन ठिकाणी : सरपंच नाही..!तालुक्यातील डोंगरवाडी, बिचूद आणि फार्णेवाडी (बी) या तीन ग्रामपंचायतींत सरपंचपदासाठी अर्जच दाखल न झाल्याने तेथे या जागा रिक्त राहणार आहेत. डोंगरवाडीत आणि फार्णेवाडीत ओबीसी संवर्गाचे आरक्षण आहे. मात्र या संवर्गातील कुटुंबांनी निवडणुकीपासून दूर राहणे पसंद केले. बिचूदमध्ये विमुक्त जातीचे आरक्षण आहे, तर कासेगावात गायरान जमिनीच्या प्रश्नावरून दोन जागांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे.