एक नजर लसीकरणावर...
जिल्ह्यात केवळ २६ टक्के लसीकरण
२,९०० डोस शिल्लक
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात कोरोना लसीकरण म्हणजे अडथळ्यांची शर्यत बनले आहे. लसीसाठी नागरिकांची धावाधाव सुरू आहे; पण पुरेशी लस मात्र उपलब्ध होताना दिसत नाही. आठवडाभरात १५ ते २० हजार डोस मिळत आहेत. १६ जानेवारी रोजी लसीकरणाला प्रारंभ झाला. आजअखेर अवघ्या टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर प्रतीक्षा यादीत हजारभर लाभार्थी आणि लसीचे मात्र फक्त १०० ते २०० डोस अशी विरोधाभासाची स्थिती आहे.
आतापर्यंत झालेले लसीकरण
फ्रंटलाईन वर्कर्स
पहिला डोस घेतलेले ३१,०८८
दुसरा डोस घेतलेले ११,३४०
लसीकरणाच्या प्रतीक्षेतील लाभार्थी ३५००
ज्येष्ठ नागरिक
पहिला डोस घेतलेले २,५१,९१८
दुसरा डोस घेतलेले ६१,०६२
लसीकरणाच्या प्रतीक्षेतील लाभार्थी ३,३७,०००
४५ ते ६० वयोगट
पहिला डोस घेतलेले २,५८,९५२
दुसरा डोस घेतलेले ३०,१९३
लसीकरणाच्या प्रतीक्षेतील लाभार्थी ११,६०,०००
१८ ते ४४ वयोगट
पहिला डोस घेतलेले १६,५२९
दुसरा डोस घेतलेले ००००
लसीकरणाच्या प्रतीक्षेतील लाभार्थी १७,४४,००८
जिल्ह्याकडे उपलब्ध लसींचा साठा
कोविशिल्ड ०००
कोव्हॅक्सिन २,९००
आतापर्यंत झालेल्या लसीकरणात
कोविशिल्ड ६,५२,०३०
पहिला डोस ५,४१,६०३
दुसरा डोस १,०३,६०२
कोव्हॅक्सिन ६३,६८०
पहिला डोस ४४,५७०
दुसरा डोस १५,२१०
एक टक्के डोस गेले वाया
- पुरवठ्यापैकी ७,८२५ म्हणजे एक टक्का डोस आजवर वाया गेले आहेत.
- लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात लस वाया जाण्याचे प्रमाण जास्त होते.
- लाभार्थ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरविणे, थंड तापमानाचा अभाव, कुपी फोडल्यानंतर निर्धारित वेळेत न संपणे, आदी कारणांनी डोस वाया गेले.