सांगली : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून हरिपूर (ता. मिरज) येथील गिरीश जाधव यांना दहा लाखाला लुटणाºया टोळीतील तिघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला बुधवारी सायंकाळी यश आले. अंकली (ता. मिरज) येथे तिघांना थरारक पाठलाग करून पकडण्यात आले. त्यांच्याकडून लुटीतील साडेसात लाखांची रोकड व मोटार जप्त केली आहे.अटक केलेल्यांमध्ये अमर शिवाजी शिंगाडे (वय ३८), दीपक शंकर जावळे (२६, दोघे रा. इस्लामपूर, ता. वाळवा) व अमर विलास कुराडे (२६, पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. न्यायालयाने त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. लुटीचा हा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल असला तरी तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने घेतली आहेत. याप्रकरणी एकूण बाराजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी तिघांना अटक केली आहे. अन्य नऊजणांच्या शोधासाठी पोलिसांचे पथके इस्लामपूर, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत रवाना केली आहेत.टोळीतील संशयित मनोज कांबळे हा फियादी गिरीश जाधव यांच्या परिचयाचा आहे. यातून कांबळे यांने जाधव यांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखविले. दहा लाख २० हजारांत मोठ्या प्रमाणात सोने देण्याचे आमिष दाखविल्याने जाधवही तयार झाले. जाधव यांनी४ मार्चला रोकड घेऊन टोळीशी संपर्क साधला. त्यावेळी टोळीने त्यांना मोटारीत बसवून कर्नाटकात नेले. निपाणी, कागल, बेळगावसह अनेक शहरांत जाधव यांना फिरविले; पण त्यांच्याशी सोने खरेदीचा व्यवहार केला नाही. कोल्हापुरातून ते सांगलीत आले. अंकली फाट्यावर आल्यानंतर संशयितांनी त्यांना मोटारीतून ढकलून देऊन त्यांच्याकडील दहा लाख२० हजारांची रोकड असलेली बॅग लंपास केली होती.स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक राजन माने, उपनिरीक्षक अंतम खाडे बुधवारी सायंकाळी घरफोडीच्या तपासासाठी सातारा जिल्ह्यातून निघाले होते. कर्मवीर चौकात त्यांच्यासमोरून कर्नाटक पासिंगची मोटार भरधाव वेगाने निघून गेली. पथकाला संशय आल्याने त्यांनी मोटारीचा पाठलाग केला. अंकली फाट्यावर मोटारीला पकडण्यात यश आले. मोटारीची झडती घेतल्यानंतर साडेचार लाखांची रोकड सापडली. त्यानंतर अमर शिंगाडे, दीपक जावळे व अमल कुराडे या तिघांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता या गुन्ह्याचा छडा लागला.रेकॉर्डवरील गुन्हेगारअटकेतील अमर शिंगाडे, दीपक जावळे व अमर कुराडे हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याकडून आणखी एका गंभीर गुन्ह्याचा छडा लागला आहे; पण तपास सुरू असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या अधिकाºयांनी माहिती देण्यास नकार दिला. येत्या दोन दिवसांत याचा उलगडा केला जाईल, असेही सांगण्यात आले.
स्वस्त सोन्याच्या आमिषाने लूट; तिघांना अटक : ‘एलसीबी’कडून पाठलाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:20 AM
सांगली : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून हरिपूर (ता. मिरज) येथील गिरीश जाधव यांना दहा लाखाला लुटणाºया टोळीतील तिघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला बुधवारी सायंकाळी यश आले.
ठळक मुद्दे साडेसात लाखांच्या रोकडसह मोटार जप्त; आणखी नऊजण फरारीच