पलूस : किसानों की आपस की फूट की वजहसे बाजार उनको लूट रहा है. या आपापसातील फुटीमुळे बाजारातील तेजी-मंदीचा फायदा शेतकºयाला न होता, तो व्यापाºयाला होत आहे, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केले.
येथे क्रांती उद्योग व शिक्षण समूहाचे प्रमुख अरुण लाड यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रांती पशू, पक्षी, कृषी प्रदर्शनाच्या समारोप व पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख, आमदार आनंदराव पाटील, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड प्रमुख उपस्थित होते. यावेळी क्रांती कारखान्याच्या सरासरी एकरी जास्त उत्पादन घेतलेल्या शेतकºयांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
राणा म्हणाले, महाराष्ट्रातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यात शासनाने दुष्काळ घोषित केला आहे. परंतु याबाबत कोणतीच ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. हे आकडे फक्त जागतिक बँकेकडून पैसे उकळण्यासाठी आहेत. आज महाराष्ट्रामध्ये नव्या धरणांची आवश्यकता नाही. परंतु जे पाणी साठविले जात आहे, त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र ऊसपट्टा म्हणून प्रचलित आहे. परंतु या उसासाठी पाटपाण्याचा वापर टाळून ठिबक सिंचन, स्प्रिंकलर अशा आधुनिक सुविधांचा वापर करुन शेती करणे आवश्यक आहे.
बॅरिस्टर बी. एन. देशमुख म्हणाले, तरुणांच्या हाताला काम आणि त्याचे योग्य दाम मिळावे, या एकमेव प्रश्नासाठी देश झगडत आहे. येणाºया प्रत्येक समस्येशी दोनहात करण्याचे धैर्य तरुणांनी ठेवणे आवश्यक आहे, तरच या लढ्याला यश येईल. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रह्मानंद पडळकर, सन्मान समितीचे अध्यक्ष सुभाष आर्वे, दत्तूशेठ सूर्यवंशी, विठ्ठलराव येसुगडे, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, व्ही. वाय. पाटील, सचिन कदम, सुनील सावंत, भीमराव महिंद, दादा पाटील, कुंडलच्या सरपंच प्रमिला पुजारी, कडेगाव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष पृथ्वीराज कदम, तंटामुक्तीचे अध्यक्ष वसंत लाड, कारखान्याचे उपाध्यक्ष आत्माराम हारुगडे, कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे, सचिव वसंत लाड उपस्थित होते.
श्रीकांत लाड यांनी स्वागत केले. श्रीकांत माने व अंकुश राजमाने यांनी सूत्रसंचालन केले. मुकुंद जोशी यांनी आभार मानले.शाळांमधून वह्या वाटणार : अरुण लाडअरुण लाड म्हणाले, शेतकºयाला शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान समजावे, निसर्गाच्या ढासळलेल्या समतोलामुळे जे नुकसान होत आहे, त्यावर मात करण्यासाठी शेतकºयांना विविध पर्यायांची माहिती व्हावी, यासाठी क्रांती पशू, पक्षी व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. गेल्या दोन वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हार-तुरे न स्वीकारण्याचा आमचा निर्णय लोकांनी मान्य केला आणि गरजूंसाठी वह्या भेट दिल्या. या वह्यांचे लवकरच विविध शाळांमधून वितरण करण्यात येणार आहे.