कुपवाड : शहरातील मंगळवार बाजार चौकात माधुरी साडी अँड सिल्क हे एम सिल्क साड्यांचे दालन सुरू झाले आहे. या दालनास कुपवाड शहर परिसरातील महिलावर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती संचालिका प्रतिभा दीपक उपाध्ये यांनी दिली.
कुपवाडमधील मंगळवार बाजारातील भाजी मंडईजवळील माधुरी साडी अँड सिल्क या सिल्क या साड्यांच्या दालनाचे उद्घाटन मंजिरी सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. या दालनाच्या उद्घाटनप्रसंगी दीपक उपाध्ये, निमिशा कल्याणी, सन्मती मालगत्ते, ऐश्वर्या उपाध्ये, माधुरी उपाध्ये, प्रमोद उपाध्ये, अनिल कवठेकर उपस्थित होते.
या दालनाच्या संचालिका प्रतिभा दीपक उपाध्ये म्हणाल्या की, या दालनात म्हैसूर सिल्क, बनारस सिल्क, कांजीवरम, लिनन, लक्ष्मीपती, पैठणी, शालू आणि पार्टीवेअर साड्यांचे असंख्य नमुने उपलब्ध आहेत. प्रत्येक साडी खरेदीवर भरघोस डिस्काउंट तर आहेच शिवाय एक सरप्राइज गिफ्टही आहे. तरी सर्व महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.