सुरेंद्र शिराळकरआष्टा : येथील प्रगतशील शेतकरी, फूल उत्पादक महादेव सावंत यांनी ‘महादेव सिडलेस’ या नावाने पेरूची नवीन जात विकसित केली आहे. १५ ऑगस्ट रोजी तिचे नामकरण करण्यात येणार आहे.पेठ-सांगली मार्गावर आष्टा येथे महादेव सावंत यांची बाग आहे. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात सर्वप्रथम डच गुलाब उत्पादन सुरू केले. जिल्हा गुलाब उत्पादक संघाचे ते नऊ वर्षे अध्यक्ष होते. नर्सरीही सुरू केली. दहा वर्षांपूर्वी त्यांनी रामफळावर सीताफळ व सीताफळावर रामफळ असे कलम केले.
मागील दोन वर्षांपासून त्यांचे बिनबियाच्या (सीडलेस) पेरूवर संशाेधन सुरू हाेते. यावर्षी त्यांच्या झाडाला ७५० ग्रॅम ते एक किलोचे बिया नसलेले ‘सीडलेस’ पेरू लागले आहेत. पेरूची चवही सर्वांच्या पसंतीला उतरत आहे. या पेरूपासून भविष्यात रोपवाटिका तयार करून त्याचा प्रसार करण्याचा संकल्प आहे.एकही बी नाही!महादेव सावंत यांचे सीडलेस पेरूवर संशोधन सुरू आहे. या पेरूचे एक झाड सध्या त्यांच्या नर्सरीत आहे. या झाडाला काही दिवसांपूर्वी एकमेकांना जोडलेला पेरू लागला होता. याचे काप घेतले असता त्यामध्ये एकही बी नव्हते. या झाडाला सध्या बहर आला असून, हे सर्व पेरू सीडलेस आहेत. त्याचा संकर करून नवा सीडलेस पेरू तयार करण्याचा मानस सावंत यांनी व्यक्त केला.