नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयात कोरोना लसीकरण जनजागृती मोहिमेचा प्रारंभ महेश जोशी, डॉ. ए. ए. मिरजे यांच्याहस्ते झाला. यावेळी सी. बी. पाटील, प्रा. ए. ए. जाधव, प्रा. संदीप पाटील व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्था संचलित नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी व डिप्लोमा महाविद्यालयाने कोरोना लसीकरण जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयातून पार पडणाऱ्या मोहिमेचा प्रारंभ नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालय येथे पार पडला.
यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी, प्राचार्य डॉ. ए. ए. मिरजे, पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे उपप्राचार्य सी. बी. पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुणवत्तापूर्ण तंत्रशिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असताना विविध सामाजिक उपक्रमांच्या संयोजनांमध्ये महाविद्यालय अग्रेसर असते. त्याचाच एक भाग म्हणून या मोहिमेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी यांनी दिली.
आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणारी ही लसीकरण मोहीम कोरोनावर मात करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. तरी पात्र असणाऱ्या व्यक्तींनी प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन या मोहिमेच्या निमित्ताने यावेळी करण्यात आले.