लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : पेठ नाका (ता. वाळवा) येथे श्री वेंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ‘गो कार्ट’ या रेसिंग कारची निर्मिती केली आहे. यामध्ये नियमावलीनुसार कारच्या रचनेपासून स्पेअर्स पार्टस्ची कलात्मक जोडणी ही जबाबदारी विद्यार्थ्यांनी सक्षमपणे पेलली. या कारची चाचणी यशस्वी झाली असून, सर्व परिमाणांना सार्थ ठरली आहे.
विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेली संशोधनात्मक बुद्धिमत्ता, तसेच या नावीन्यपूर्ण प्रकल्पामध्ये घेतलेल्या पुढाकाराबद्दल संस्थेचे सचिव राहुल महाडिक, कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी, प्राचार्य डॉ. ए.ए. मिरजे यांनी अभिनंदन केले.
महाविद्यालयाने ‘कार्बन न्युट्रिलिटी’ या संकल्पनेसाठी नामांकित विद्यापीठासह पुढाकार घेतला आहे. महाविद्यालयाचे हे ‘ग्लोबल पाऊल’ अभिमानास्पद आहे, असे मत राहुल महाडिक यांनी व्यक्त केले.
रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट सेलच्या माध्यमातून सत्तरपेक्षा जास्त शोधनिबंध आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध केले आहेत. महाविद्यालयाच्या माध्यमातून प्रोजेक्ट डेव्हलपमेंटपासून पेटंटपर्यंत मार्गदर्शन उपलब्ध होत आहे, अशी माहिती प्रा. जोशी यांनी दिली.
रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे प्रमुख प्रा. रूपेश फोंडे, सर्व विभागाचे विभागप्रमुख, तसेच प्रा. हेमंत गावडे, प्रा. नीलेश पवार, प्रा. पंकज मस्कर, प्रा. एस.सी. बुद्रुक, प्रा. एस.सी. पाटील यांनी परिश्रम घेतले.