शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

४९ वर्षांचा अखंड प्रवास, ११ मे १९७१ ला पहिल्यांदा धावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 6:01 PM

कोल्हापूर आणि मिरजेत इंजिन वळवण्याचे काम कर्मचाऱ्यांना करावे लागे. सुटे इंजिन एका विहिरीसदृश खड्ड्यावर थांबवून मोटर किंवा कर्मचाºयांच्या ताकदीने १८० अंशात फिरवले जायचे. कोल्हापूर स्थानकात अजूनही हा खड्डा दिसतो.

ठळक मुद्दे महालक्ष्मी एक्स्प्रेसचे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पणपश्चिम महाराष्ट्राची विकासवाहिनी

संतोष भिसे।सांगली : पश्चिम महाराष्ट्राची विकासवाहिनी ठरलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने ११ मेरोजी अखंड प्रवासाची ४९ वर्षे पूर्ण केली. कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूरदरम्यान लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवास घडवणाऱ्या महालक्ष्मीचा सुवर्णमहोत्सवी प्रवास सुरू झाला आहे. प्रवाशांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि मध्य रेल्वेला अभिमानाची असणारी ‘महालक्ष्मी’ पश्चिम महाराष्ट्रासाठी जणू विकासवाहिनीच ठरली आहे.

मिरज-कोल्हापूर लोहमार्गाच्या ब्रॉडगेजनंतर ११ मे १९७१ रोजी महालक्ष्मी एक्स्प्रेस पहिल्यांदा धावली. त्यावेळी स्लिपरबर्थ नसल्याने प्रथम श्रेणीच्या डब्यातच बर्थवर झोपावे लागायचे. आसने लाकडाची आणि इंजिन कोळशाचे होते. कºहाड आणि वाठारमध्ये कोळसा व पाण्यासाठी थांबा घ्यावा लागायचा. संध्याकाळी पाच वाजता कोल्हापुरातून निघून मुंबईत त्यावेळच्या व्हिक्टोरिया टर्मिनसला दुसºयादिवशी दुपारी साडेबाराला पोहोचायची. कोल्हापूर आणि मिरजेत इंजिन वळवण्याचे काम कर्मचाऱ्यांना करावे लागे. सुटे इंजिन एका विहिरीसदृश खड्ड्यावर थांबवून मोटर किंवा कर्मचाºयांच्या ताकदीने १८० अंशात फिरवले जायचे. कोल्हापूर स्थानकात अजूनही हा खड्डा दिसतो.

ही गाडी हुबळी विभागाकडून मुंबईला ३०४ व परतताना ३०३ क्रमांकासह धावायची. कालांतराने क्रमांक ७४११ व ७४१२, १०११ आणि १०१२ झाले. सध्या १७४११ व १७४१२ असा या एक्स्प्रेसचा क्रमांक आहे. सत्तरच्या दशकात बेंगलोरहून थेट मुंबईला पुरेशा गाड्या नव्हत्या. कर्नाटकातील प्रवासी हुबळी-मिरज पॅसेंजरने मिरजेत येऊन पुढे महालक्ष्मीमधून मुंबईला जायचे.

कोल्हापूर-सांगलीकरांसाठी महालक्ष्मी अभिमानाची. महालक्ष्मीने मुंबईला जाणे हा जणू विमानप्रवासाचा अनुभव असे. काळ बदलला तरी महालक्ष्मीची ‘क्रेझ’ कायम आहे. बाराही महिने तिचे आरक्षण फुल्ल असते. अत्यंत किरकोळ दुर्घटनांचा अपवाद करता ती अखंड धावत आहे. आजवर कोट्यवधींचे उत्पन्न महालक्ष्मी एक्स्प्रेसने रेल्वेला मिळवून दिले आहे.

महालक्ष्मी-तिरुपतीचा भावनिक बंधमहालक्ष्मी एक्स्प्रेसला हरिप्रियाचे कनेक्शन दिल्याने महालक्ष्मी-बालाजीचा भावनिक बंधही तयार झाला आहे. मुंबईहून येणारी महालक्ष्मी दुपारी हरिप्रिया एक्स्प्रेस म्हणून तिरुपतीला निघते.

वायंगणीची दुर्घटनागतवर्षी २७ जुलै २०१९ रोजी बदलापूरजवळ वायंगणी येथे उल्हास नदीच्या महापुरात महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकून पडली होती. हवाई दलाच्या मदतीने आॅपरेशन महालक्ष्मी राबविण्यात आले. महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या इतिहासात ही दुर्घटना कधीही न विसरण्यासारखी आहे.

कोट्यवधींचे उत्पन्न दिलेकोल्हापूर-सांगलीकरांसाठी महालक्ष्मी अभिमानाची. ठरली आहे. आजवर कोट्यवधींचे उत्पन्न रेल्वेला मिळवून दिले आहे.

उद्घाटन : ११ मे १९७१प्रवास : ५१८ कि.मी.वेळ : १०.५७ तासक्रमांक : १७४११, येताना १८ थांबेक्रमांक : १७४१२, जाताना १९ थांबेसरासरी गती : ४७.३८ कि.मी./प्रति तासकमाल गती : ११० कि.मी./प्रति तास

टॅग्स :railwayरेल्वेkolhapurकोल्हापूरbusinessव्यवसाय