शहरं
Join us  
Trending Stories
1
ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन
2
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
3
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
4
पाकिस्तानात 8 वर्षांनंतर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला; पॅसेंजर वाहनावर ओपन फायरिंग, 39 जणांचा मृत्यू
5
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
6
अदानी ग्रुपचे शेअर्स घरसल्याने LICला मोठा धक्का; तब्बल १२ हजार कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज
7
न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...
8
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांसोबत गेले तर...? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
9
३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो
10
Shah Rukh Khan : शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीबाबत खळबळजनक खुलासा
11
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
12
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
13
Kalbhairav Jayanti 2024: कालभैरव जयंतीला 'हे' तोडगे करा आणि संसार तापातून मुक्त व्हा!
14
'धूम २'मध्ये ऐश्वर्या राय बच्चनने हृतिक रोशनसोबत दिला होता किसिंग सीन, याबद्दल अभिनेत्री म्हणाली....
15
कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान
16
Ration Card धारकांसाठी मोठी बातमी! ५.८ कोटी शिधापत्रिका होणार रद्द; तुमचं नाव तर यात नाही ना?
17
'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?
18
अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग चर्चेत, म्हणाले, "मी माझ्या कुटुंबाविषयी क्वचितच बोलतो कारण..."
19
४ ग्रहांचे गोचर: ७ राशींना डिसेंबर करेल मालामाल, अनेक लाभ; उत्तम नफा, पद-पैसा-ऐश्वर्य काळ!
20
'खलनायक'मधील साँगसह Yashasvi Jaiswal साठी आला टीम इंडियासाठी 'नायक' होण्याचा संदेश

लढाई राेहित पाटील यांच्या भवितव्याची; संजयकाकांच्या अस्तित्वाची

By हणमंत पाटील | Published: November 08, 2024 6:08 AM

Maharashtra Assembly Election 2024: दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील व आमदार सुमनताई पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचे राजकीय भवितव्य ठरविणारी, तसेच भाजपचे माजी खासदार व अजित पवार गटाचे उमेदवार संजय पाटील यांच्या अस्तित्वाची लढाई तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात सुरू आहे.

- हणमंत पाटील सांगली - दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील व आमदार सुमनताई पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचे राजकीय भवितव्य ठरविणारी, तसेच भाजपचे माजी खासदार व अजित पवार गटाचे उमेदवार संजय पाटील यांच्या अस्तित्वाची लढाई तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात सुरू आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. 

सांगली जिल्ह्यातील तासगाव व कवठेमहांकाळ या दोन दुष्काळी तालुक्यांच्या विधानसभा मतदारसंघात आता टेंभू, म्हैसाळ व आरफळ योजनेचे पाणी आले. आता या योजनांच्या श्रेयाचे राजकारण सुरू आहे. तसेच, भाजपचे संजय पाटील यांनी ऐनवेळी अजित पवार गटात प्रवेश करून उमेदवारी घेतली. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी त्यांच्यामागे ताकद लावली आहे. तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी रोहित पाटील यांना पाठबळ दिले. त्यामुळे अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी होणारी लढत लक्षवेधी ठरली आहे. 

मतदारसंघातील कळीचे मुद्दे...- जगभर प्रसिद्ध असलेली तासगावची द्राक्षे निर्यात होतात. परंतु, या भागात द्राक्ष निर्यात केंद्र व पॅक हाऊस नाही. तसेच, शासनाने द्राक्षातील रासायनिक अंश (रेसेड्यू), माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा या भागात सुरू केलेली नाही. - मतदारसंघातील अलकूड-मणेराजुरी एमआयडीसीला कागदोपत्री मंजुरी मिळाली आहे. परंतु, त्याची अंमलबाजवणी व उभारणी करण्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून मिळालेला नाही. - रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथे शासनाचा मेंढी फार्म प्रकल्प आहे. परंतु, त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याने हा प्रकल्प दुर्लक्षित आहे. - द्राक्ष, भाजीपाला, डाळिंब व ऊस ही नगदी पिके आहेत. परंतु, त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग व कारखाने बंद पडलेले असल्याने बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४tasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळRohit Patilरोहित पाटिलsanjaykaka patilसंजयकाका पाटील