शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 10:50 AM

Maharashtra Assembly Election 2024 : जयंत पाटील म्हणाले, विशाल पाटील, तुम्ही अपक्ष उमेदवारीच्या नादाला लागण्याऐवजी तुतारीच्या नादाला लागला असता, तर तुमचे मताधिक्य आणखीन दीड लाखाने वाढले असते.

Maharashtra Assembly Election 2024 : मिरज : मिरजेत महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत गुरुवारी 'घड्याळ' चिन्हावरून काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी रंगली. मिरजेतील प्रचारसभेत दोन्ही नेत्यांसह उद्धवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील, काँग्रेस नेते मोहन वनखंडे यांच्यासह महाआघाडीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. 

जयंत पाटील यांचे आगमन उशिरा झाले. ते येण्यापूर्वीच विशाल पाटील यांनी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केल्याने मिरजेतील राष्ट्रवादीचे स्थानिक नेते नाराज झाले. प्रचारसभेत विशाल पाटील म्हणाले, कोण काहीही बोलले, तरी यावेळी मशालसोबत विशालपण आहे, शिवाय हातात घड्याळ बांधले आहे. यावेळी नेत्यांनी आमचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे, असे सांगत त्यांना आठवण करून दिली. 

जयंत पाटील यांनीही त्या संवादात उडी घेत चिमटा काढला. ते म्हणाले, आमचे तुतारी चिन्ह अपक्ष खासदारांना कळण्यासाठी तुतारी व्यवस्थित वाजवा. यावर एकच हशा पिकला. जयंत पाटील म्हणाले, विशाल पाटील, तुम्ही अपक्ष उमेदवारीच्या नादाला लागण्याऐवजी तुतारीच्या नादाला लागला असता, तर तुमचे मताधिक्य आणखीन दीड लाखाने वाढले असते. आमचे घड्याळ चिन्ह चोरीला गेले आहे. मात्र, पृथ्वीवर एकमेव असा पक्ष आहे की, ज्या पक्षाला घड्याळ चिन्ह मिळाले असले, तरी त्याच्या खाली चिन्ह न्यायप्रविष्ठ असल्याचे लिहावे लागतेय. 

"त्यांच्यावर कसलेही बंधन नाही"पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी वेगवेगळ्या मतदारसंघांत वेगवेगळी भूमिका घेणाऱ्या खासदार म्हणाले, वेगवेगळ्या मतदारसंघांत काय भूमिका घ्यायची, हा ज्याचा- त्याचा प्रश्न आहे. अपक्ष खासदार असल्याने विशाल पाटील यांच्यावर कसलेही बंधन नाही. धड ते काँग्रेसमध्येही नाहीत आणि कुठेही नाहीत. ते तर अपक्ष आहेत.

मिरज विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत दरम्यान, मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून मोहन वनखंडे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत मिरज विधानसभा मतदारसंघावरून पेच निर्माण झाला होता. मात्र मोहन वनखंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता या मतदारसंघात भाजपचे सुरेश खाडे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे तानाजी सातपुते विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे विज्ञान माने यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.त्यामुळे मिरजमध्ये नेमकी कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४miraj-acमिरजSangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलvishal patilविशाल पाटील