शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

राजकीय पक्षांना सत्तेत लाडक्या बहिणींचे वावडे का?, सर्वच पक्षांकडून महिला उमेदवारांबाबत दुजाभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 4:59 PM

सांगली : आजची महिला अबला नसून सबला झाली आहे, असे भाषण देणारे नेते मात्र खुद्द महिला शक्तीवरच विश्वास ठेवत ...

सांगली : आजची महिला अबला नसून सबला झाली आहे, असे भाषण देणारे नेते मात्र खुद्द महिला शक्तीवरच विश्वास ठेवत नसल्याचे दिसून येते. सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील एकही जागेवर महायुती व महाविकास आघाडीने महिला उमेदवार दिलेला नाही. राजकीय व्यासपीठावर महिलांचे गुणगाण गाणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना लाडक्या बहिणींचे वावडे का? असा प्रश्न महिलांना पडला आहे.आजची महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. यात राजकारणही सुटलेले नाही. लोकसभा ते विधानसभा तेथेही महिला महत्त्वाची पदे भूषवत आहेत. राजकारणात महिलांना विशेष ५० टक्के आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले. पुढील निवडणुकीत ते लागू होणार आहे. मात्र, आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, या निवडणुकीत महिलांसोबत सर्वच राजकीय पक्षांकडूनच दुजाभाव करण्यात आल्याचा प्रकार जिल्ह्यात घडला आहे.

जिल्ह्यातील आठही विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांचे चेहरे आता स्पष्ट झाले आहेत. महायुती व महाविकास आघाडीने आपली यादी जाहीर केली असून, त्यांच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. येथे मात्र आठही विधानसभा क्षेत्रात त्यांनी एकही महिला उमेदवार दिलेला नाही. विशेष म्हणजे, भाजपने मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या दोघांना पुन्हा संधी दिली. पण एकाही महिला उमेदवाराला संधी दिलेली नाही. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धवसेना या पक्षांची सुद्धा हीच स्थिती आहे.

जिल्ह्यात महिलांना १० टक्केही संधी नाही..राजकारणात महिलांसाठी राखीव जागांमुळे, त्यांच्या सहभागामुळे सर्वसामान्य महिलांचे जीवनमान बदलू लागले आहे. कालपर्यंत शेतात खुरपणारी, चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री पंचायतीत जाऊन गावाचा कारभार पाहू लागली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ५० टक्के राहू द्या, किमान १० टक्के तरी महिलांना संधी देण्याचे धाडस राजकीय पक्षांनी दाखवण्याची गरज होती. पण गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राष्ट्रीय आणि स्थानिक राजकीय पक्षांनी सांगली जिल्ह्यातील महिलांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील राजकारणापासून दूरच ठेवले आहे.

सांगली जिल्ह्यातील महिला आमदारआमदार - मतदारसंघ - पक्ष - वर्षकळंत्रे आक्का - मिरज - काँग्रेस - १९५२सरोजिनी बाबर - शिराळा - काँग्रेस - १९५२शालिनीताई पाटील - सांगली - काँग्रेस - १९८०सुमनताई पाटील - तासगाव-क. महांकाळ - राष्ट्रवादी - २०१५सुमनताई पाटील - तासगाव-क. महांकाळ - राष्ट्रवादी - २०१९

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीWomenमहिलाPoliticsराजकारणwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024