काँग्रेसचे सांगली, जत मतदारसंघांतील बूथच्या मत पडताळणीसाठी अर्ज; किती रुपये केले जमा.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 06:55 PM2024-12-03T18:55:10+5:302024-12-03T18:55:51+5:30

पृथ्वीराज पाटील, विक्रमसिंह सावंत यांचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Application for vote verification of booths in Sangli, Jat constituencies from Congress | काँग्रेसचे सांगली, जत मतदारसंघांतील बूथच्या मत पडताळणीसाठी अर्ज; किती रुपये केले जमा.. वाचा

काँग्रेसचे सांगली, जत मतदारसंघांतील बूथच्या मत पडताळणीसाठी अर्ज; किती रुपये केले जमा.. वाचा

सांगली : विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम यंत्रांवर संशय व्यक्त करत काँग्रेसनेसांगली १० आणि जत विधानसभा मतदारसंघांतील दोन बूथच्या मतपडताळणीची मागणी केली आहे. त्यासाठी सांगलीचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील, जतमधून उमेदवार विक्रमसिंह सावंत यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला आहे. मतपडताळणीसाठीची पाच लाख ६६ हजार ४०० रुपये जमा केले आहेत.

विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर महाविकास आघाडीतील बहुतांश वरिष्ठ नेत्यांनी ईव्हीएम यंत्रावर संशय व्यक्त केला आहे. उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात मतपडताळणीची मागणी करावी, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सांगली आणि जत मतदारसंघांसाठी पराभूत उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक विभागाच्या नियमानुसार, एका बूथच्या मत पडताळणीसाठी ४७ हजार २०० रुपये शुल्क भरावा लागतो. जतमध्ये विक्रमसिंह सावंत यांनी दोन बूथच्या पडताळणीची मागणी करून ९४ हजार ४०० रुपये भरले आहेत. सांगलीत पृथ्वीराज पाटील यांनी दहा बूथच्या पडताळणीची मागणी करत चार लाख ७२ हजार रुपये भरले आहेत.

नियमानुसार, या दोन्ही उमेदवारांनी कोणत्या बूथबाबत शंका आहेत, त्या यंत्रांचे क्रमांकही सादर केले आहेत. त्यासाठी एक तज्ज्ञ प्रतिनिधी सुचवण्यात आला आहे. ही प्रक्रिया कधीपर्यंत पार पाडली जाईल, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.

पाच टक्क्यांपर्यंत यंत्र, चिठ्ठ्यांची पडताळणी

निवडणूक आयोगाच्या धोरणानुसार, एकूण मतदान यंत्रांच्या पाच टक्के यंत्र व चिठ्ठ्यांची पडताळणी केली जाऊ शकते. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार त्याची मागणी करू शकतात.

या केंद्रावर होणार मतपडताळणी

सांगली विधानसभा मतदारसंघातील बुथ नंबर १५, २०, ७२, ९७, १३८, १९०, २४२, २७७, २९४, ३१३ आणि जत विधानसभा मतदारसंघातील दरीबडची येथील बुथ नंबर २२०, २२१ केंद्रांवरील बूथच्या मतपडताळणीची मागणी काँग्रेसने केली आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून मतपडताळणी होणार आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Application for vote verification of booths in Sangli, Jat constituencies from Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.