शिराळा : शिराळा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मानसिंग फत्तेसिंगराव नाईक यांची स्थावर व जंगम मालमत्ता १५ कोटी ९१ लाख रुपयांची आहे. यामध्ये जंगम मालमत्ता ५ कोटी ६ लाख ३२ हजार १९६ रुपये, तर स्थावर मालमत्ता १० कोटी ८५ लाख ६० हजार रुपयांची आहे.त्यांनी १ कोटी २ लाख ८ हजार ६५२ रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यांच्याकडे ४०० ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने आहेत. पत्नी सुनीतादेवी यांच्या नावे १४ कोटी १० लाखांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. ८० ग्रॅम सोने व चारचाकी आहे. त्यांच्या नावे ५३ लाख ५४ हजार रुपयांचे कर्ज आहे. २०१९ मध्ये १० कोटी २७ लाख रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता होती.भाजप महायुतीचे उमेदवार सत्यजित शिवाजीराव देशमुख यांची स्थावर व जंगम मालमत्ता ९ कोटी ७२ लाखांची आहे. यामध्ये जंगम मालमत्ता १ कोटी ६५ लाख ३४ हजार ९८८ रुपयांची, तर स्थावर मालमत्ता ८ कोटी ६ लाख २० हजार रुपयांची आहे. त्यांच्या नावे १ कोटी ११ लाख ८ हजार ९८१ रुपये कर्ज आहे.त्यांच्याकडे ११०० ग्रॅम वजनाचे सोने व चांदीचे दागिने आहेत. पत्नी रेणुकादेवी व मुलगी साईतेजस्वी यांच्या नावे स्थावर व जंगम मालमत्ता, घर, गाडी, सोने आदी २ कोटी ६८ लाख १ हजार ६०२ रुपयांची मालमत्ता आहे. यामध्ये ७५० ग्रॅम सोने, एक किलो चांदीचा समावेश आहे. त्यांच्या नावे १ कोटी ३४ लाख ६ हजार ५८९ रुपयांचे कर्ज आहे. २०१९ मध्ये ४ कोटी ५० लाखांची स्थावर व जंगम मालमत्ता होती.
महाडिक यांची मालमत्ता सहा कोटींचीअपक्ष उमेदवार सम्राट नानासाहेब महाडिक यांची जंगम मालमत्ता ५ कोटी ९७ लाखांची आहे. त्यांच्या नावे ११ एकर ३२ गुंठे शेतजमीन आहे. ७५ ग्रॅम सोने आहे. पत्नी तेजस्वी, मुले समरप्रताप, तेजप्रताप यांची स्थावर व जंगम मालमत्ता, जमीन, घर, गाडी, सोने आदींची माहितीही त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे.जंगम मालमत्ता २ कोटी ३९ लाख ४४ हजार १८ रुपयांची आहे. ८४७ ग्रॅम सोने व एक किलो चांदी आहे. २०१९ मध्ये २ कोटी ४३ लाखांची स्थावर व जंगम मालमत्ता होती.