शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

Vidhan Sabha Election 2024: उमेदवार शब्दाला जागले, तर सांगलीचं शांघाय होईल; घोषणांचा पाऊस अवकाळी न ठरो 

By संतोष भिसे | Published: November 16, 2024 5:55 PM

चांगल्या सांगलीची स्वप्नेच किती दिवस?

संतोष भिसेसांगली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गेल्या दोन आठवड्यांत सर्वच मतदारसंघांतील उमेदवारांनी घोषणा आणि आश्वासनांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. हा पाऊस अवकाळी ठरला नाही आणि सगळेच उमेदवार शब्दाला जागले, तर सांगलीचं शांघाय होण्यास वेळ लागणार नाही.अर्थात, गेल्या २५-३० वर्षांपासून जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांचे घोंगडे भिजतच ठेवणाऱ्या बोलघेवड्या उमेदवारांची ही आश्वासने म्हणजे `बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहे` हे मतदार चांगलेच ओळखून आहेत. सांगलीच्या शेरीनाल्याचा प्रश्न वर्षानुवर्षे सोडवू न शकलेले लोकप्रतिनिधी सांगलीकरांना गटारीचे पाणी पाजण्याचे पाप करीत आहेत याचीही जाण मतदारांना आहे. पण `उडदामाजी काळेगोरे` म्हणत मतदान करत आहेत.उमेदवार म्हणाले, `सांगलीत आयटी पार्क उभा करू`, तेव्हा मतदारांनी आपली मुले आयटीमध्ये ऐटीत जातानाची स्वप्ने पाहिली. दिल्ली-मुंबईतील नेते विकासाचा कैवार घेऊन सांगलीच्या वेशीवर धडकले. कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प लोकांसमोर सजवून-धजवून ठेवले. ते पाहून लोक त्यांना निवडून देतीलही, पण सांगलीचा शांघाय खरोखरच होणार का? याची प्रतीक्षा त्यांना राहील. निवडून आलेले मंत्री होतील, मुख्यमंत्रीही होतील, पण सांगलीकरांची माफक अपेक्षा इतकीच की कृष्णेत मिसळणारे सांगलीतील गटारीचे पाणी थांबावे.हाडे खिळखिळी न होता पेठपर्यंत प्रवास करता यावा. कोल्हापूरपर्यंत वाहतूक कोंडीत न अडकता जाता यावे, पदवी मिळविलेल्या पोराला सांगलीतच चांगली नोकरी मिळावी आणि उतारवयातील आईवडिलांना सांभाळत तो गावातच रहावा. सांगलीचे अगदीच शांघाय झाले नाही, तरी `चांगली सांगली` बनविणे तरी मुश्किल नक्कीच नाही.

विमानतळ जोरातचकवलापुरात होणार होणार म्हणून गेली अनेक वर्षे सांगलीकरांच्या स्वप्नात दिसणाऱ्या विमानतळालाही नेत्यांनी `दे धक्का` देण्याचा प्रयत्न केला. नेत्यांची हेलिकॉप्टरे कवलापूरच्या माळावर धूळ उडवत उतरली, धूळ उडवत उडून गेली. जाताना सांगलीकरांच्या स्वप्नाला गुलाबी रंग देऊन गेली.

आम्ही `हे` करू आणि `ते` करूगेल्या पंधरवड्याभरात उमेदवारांनी उघडलेल्या आश्वासनांच्या पोतडीकडे नजर टाकली असता शिळ्या कढीलाच ऊत आणण्याचा प्रयत्न सर्वत्र दिसतो. ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ, वाकुर्डे आदी पाणीयोजना या निवडणुकीतही चलनी नाण्यासारख्या वापरल्या गेल्या. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र, एमआयडीसीची उभारणी व तरुणांना रोजगार, महिलांसाठी उद्योग ही गाजरेदेखील मतदारांना दाखविण्यात आली. शेतमालाला भाव, लाजिस्टिक पार्क, ड्रायपोर्ट, महागाई, महिलांचे संरक्षण, गुन्हेगारी हे पत्तेदेखील जोरात चालविण्यात आले. उमेदवारांच्या तोंडभरल्या घोषणा मतदारांनी मन लावून ऐकल्या आणि जोरजोराने टाळ्यादेखील वाजविल्या; पण ते आता कोणाला गुलालाचा मानकरी ठरविणार आणि कोणाला घरात बसविणार हे दि. २३ नोव्हेंबर रोजी कळेल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024