Sangli Politics: जयंत पाटील यांची बालेकिल्ल्यातच मताधिक्यासाठी दमछाक, 'घड्याळ' राहिले आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 06:55 PM2024-11-27T18:55:25+5:302024-11-27T18:55:54+5:30

युनूस शेख इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील सलग आठवा विजय नोंदविताना आ. जयंत पाटील यांची चांगलीच दमछाक झाली. पहिल्या ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Jayant Patil struggle for votes in Islampur Assembly Constituency | Sangli Politics: जयंत पाटील यांची बालेकिल्ल्यातच मताधिक्यासाठी दमछाक, 'घड्याळ' राहिले आघाडीवर

Sangli Politics: जयंत पाटील यांची बालेकिल्ल्यातच मताधिक्यासाठी दमछाक, 'घड्याळ' राहिले आघाडीवर

युनूस शेख

इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील सलग आठवा विजय नोंदविताना आ. जयंत पाटील यांची चांगलीच दमछाक झाली. पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत आपले मताधिक्य वाढते ठेवण्याच्या परंपरेला दुसऱ्यांदा लढणाऱ्या निशिकांत भोसले-पाटील यांनी ‘ब्रेक’ लावल्याचे स्पष्ट झाले. यावेळी पहिल्यांदाच निशिकांत पाटील यांनी २१ पैकी ५ फेऱ्यांमध्ये जयंत पाटील यांच्यावर आघाडी घेण्याची किमया करून दाखवली.

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील ५७ पैकी २० गावांमध्ये निशिकांत पाटील यांनी आ. जयंत पाटील यांच्यापेक्षा मतांची आघाडी घेतल्याचे मतमोजणीनंतरच्या गावनिहाय आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. जयंत पाटील यांना इस्लामपूर शहरातून सर्वाधिक ७ हजार २०३ इतके मताधिक्य मिळाले आहे.

निशिकांत पाटील यांना भवानीनगर (२३२), बेरडमाची (९१), दुधारी (४८), खरातवाडी (२४), रेठरेहरणाक्ष (५९), शिरगाव (२१७), तुजारपूर (१०७), मर्दवाडी (४), गोटखिंडी (१), मिरजवाडी (१२), कारंदवाडी (१२५), तुंग (६०५), फाळकेवाडी (२७), मौजे डिग्रज (४६), ढवळी (२३३), कसबे डिग्रज (११३), दुधगाव (३१८), कवठेपिरान (४९७), सावळवाडी (१७८), समडोळी (७००), मालेवाडी (२७) अशा मतांची आघाडी वरील गावांतून मिळाली आहे.

तर आ. जयंत पाटील यांना किल्ले मच्छिंंद्रगड (६४६), लवणमाची (९७), येडेमच्छिंद्र (६८), कोळे (१४२), नरसिंहपूर (२४६), बिचुद (१३२), ताकारी (४४६), शिरटे (४५१), गौंडवाडी (३०), बनेवाडी (११६), साटपेवाडी (१४), बहे (२६), मसुचीवाडी (१२३), हुबालवाडी (३३०), फार्णेवाडी-बी (९०), बोरगाव (६४४), साखराळे (८७५), जुने खेड (३), नवे खेड (१८१), इस्लामपूर (७२०३), वाळवा (२७५), अहिरवाडी (४२), पडवळवाडी (७७), गाताडवाडी (११३).
बावची (५७३), कृष्णानगर (४), आष्टा (८१), पोखर्णी (४३), भडकंबे (२४९), नागाव (७१), काकाचीवाडी (२३८), रोझावाडी (५११), फार्णेवाडी-एस (१४५), बागणी (१६७), कोरेगाव (८३६), शिगाव (२८७) या गावांतून जयंत पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे.

इस्लामपूर मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका चुरशीने होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे यापुढील काळात मतदारसंघातील राजकीय वातावरण नेहमीच तापलेले राहणार आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Jayant Patil struggle for votes in Islampur Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.