शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

तुम्हाला आता मुख्यमंत्री होऊनच दाखवतो, जयंत पाटलांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 5:44 PM

कसबे डिग्रज : मला विरोध करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की, वाळव्याचे पाणी फार वेगळे आहे. त्यात तुंगाच्या हनुमानाचा मला आशीर्वाद ...

कसबे डिग्रज : मला विरोध करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की, वाळव्याचे पाणी फार वेगळे आहे. त्यात तुंगाच्या हनुमानाचा मला आशीर्वाद आहे. त्यामुळे तुम्हाला आता मुख्यमंत्री होऊनच दाखवतो, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्रीअजित पवारांना अप्रत्यक्ष प्रत्युत्तर दिले.तुंग (ता. मिरज) येथे महाविकास आघाडीच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी झाला. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावरून जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याचा समाचार जयंत पाटील यांनी तुंग येथील सभेत घेतला. ते म्हणाले, मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार आहे. पण, आम्हाला डिवचून तुम्हाला काय फायदा होणार? तुम्ही तर पक्ष फोडूनही उपमुख्यमंत्रीच राहिलात.पाटील म्हणाले की, महायुतीचे सरकार भ्रष्टाचाराने बरबटले आहे. फेक निगेटिव्ह पसरले जात आहेत. जाती-जातीत अन् समाजामध्ये भांडणे लावण्याचे एकमेव काम ते करताहेत. त्यामुळे या सरकारला महाराष्ट्राची जनता कंटाळली आहे. राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे. पण, कार्यकर्त्यांनी गाफिल राहू नये. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना साथ द्यावी.ते म्हणाले, लाडकी बहीण योजना सुरू असली, तरी महागाईने कळस गाठला आहे.जीवनाश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोल, डिझेलही लोकांना परवडेना झाले आहे, तर शेतीमालाचे भाव पूर्ण घसरले आहेत. अतिवृष्टी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही, अशी अवस्था या सरकारची आहे. त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड असंतोष आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीJayant Patilजयंत पाटीलChief Ministerमुख्यमंत्रीAjit Pawarअजित पवारwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024