शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
3
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
4
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
5
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
6
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
7
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
8
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
9
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
10
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
11
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
13
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
14
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
15
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
16
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
17
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
18
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
19
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
20
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश

Vidhan Sabha Election 2024: खानापुरात अनिल बाबर गटाच्या हॅटट्रिकला विरोधकांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 6:37 PM

लक्षवेधी तिरंगी लढत : ३४ वर्षांपासून पाटील व बाबर घराण्यात लढत

संदीप मानेखानापूर : खानापूर विधानसभा मतदारसंघात १९९० पासून सलग आठवेळा सातत्याने निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या बाबर गटाच्या हॅटट्रिकला यावेळी विरोधी पाटील व देशमुख गटांनी कडवे आव्हान दिले आहे.खानापूर मतदारसंघ हा माजी आमदार संपतराव माने यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासह या मतदारसंघाचे त्यांनी चार वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या अनिल बाबर यांनी वर्ष १९९० मध्ये विजय मिळवत विधानसभेत पहिल्यांदा पाऊल टाकले.अनिल बाबर हे १९९०, १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९ असे सलग सात वेळा विधानसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. त्यापैकी त्यांना १९९०, १९९९, २०१४, २०१९ या चार वेळा विजय मिळाला; पण त्यांना विजयाची हॅटट्रिक पूर्ण करता आली नव्हती. या काळात त्यांना प्रामुख्याने माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या गटाशी प्रत्येकवेळी संघर्ष करावा लागला.

तिरंगी लढतीमुळे वाढली चुरस२०१४ व २०१९ च्या सलग दोन विजयांमुळे २०२४ च्या निवडणुकीत बाबर यांना हॅटट्रिकची संधी होती. मात्र, त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांचे वारसदार म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर हे रिंगणात उतरले असून त्यांच्यापुढे राजेंद्रअण्णा देशमुख व वैभव पाटील यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. या तिरंगी लढतीत मतदारसंघातील जनता बाबर गटाला हॅटट्रिकची संधी देते की विरोधक त्यांचा हॅटट्रिकचा मनसुबा उधळतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

एकमेव संपतराव माने यांची हॅटट्रिकखानापूर विधानसभा मतदारसंघातून १९६२, १९६७ व १९७२ असे सलग तीन वेळा निवडून येण्याचा बहुमान खानापूरचे माजी आमदार संपतराव माने यांच्या नावावर आहे. माने यांच्यानंतर खानापूर मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक कुणालाही साधता आली नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४khanapur-acखानापूरMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024