संतोष भिसेसांगली : विधानसभा निवडणुकीच्या खर्चात पहिल्या टप्प्यात तासगाव, खानापूर आणि शिराळा मतदारसंघ आघाडीवर राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारांनी प्रचार कालावधीतील १६ नोव्हेंबरपर्यंतचा खर्च निवडणूक आयोगाला सादर केला आहे.जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांतील लढती प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात अतिशय चुरशीने झाल्या, त्यामुळे खर्चामध्येही उमेदवारांना हात ढिला सोडावा लागला. प्रचारकाळात तीनवेळा खर्च प्रशासनाकडे सादर करण्याचा नियम आहे. त्यानुसार काही उमेदवारांनी ८ नोव्हेंबरपर्यंतचा, तर काहींनी १६ नोव्हेंबरपर्यंतचा खर्च सादर केला आहे. १८ नोव्हेंबर रोजी जाहीर प्रचार संपल्याने तत्पूर्वीच्या १६ नोव्हेंबरपर्यंतचा खर्च दिला आहे. खर्चाची मर्यादा ४५ लाख रुपये होती.मतदारसंघ आणि प्रमुख उमेदवारांचा खर्च असा :
- तासगाव-कवठेमहांकाळ :रोहित पाटील - १६ नोव्हेंबरपर्यंत - २६ लाख ९३ हजार ५५५.संजय पाटील - १४ नोव्हेंबरपर्यंत - ३० लाख ८० हजार ३०८.
- जत -गोपीचंद पडळकर - ६ नोव्हेंबरपर्यंत - ७ लाख ५८ हजार ३४६,तम्मनगौडा रवीपाटील - १६ नोव्हेंबरपर्यंत - १२ लाख ५७ हजार १३०.विक्रमसिंह सावंत - १६ नोव्हेंबरपर्यंत - १९ लाख १७ हजार २९३.
- खानापूर-सुहास बाबर - १८ लाख ६ हजार ९२२,वैभव पाटील - २१ लाख ६३ हजार ४३५,राजेंद्रअण्णा देशमुख - ८ लाख ४५ हजार ७२ (तिघेही १६ नोव्हेंबरपर्यंत).
- पलूस-कडेगाव -डॉ. विश्वजित कदम - ६ नोव्हेंबरपर्यंत - ८ लाख २७ रुपये,संग्रामसिंह देशमुख - ८ नोव्हेंबरपर्यंत - २ लाख ३८ हजार ३२०.
- सांगली-जयश्री पाटील- ८ लाख ८३ हजार ९१९,पृथ्वीराज पाटील - १२ लाख २ हजार ९८ (दोघेही १२ नोव्हेंबरपर्यंत),सुधीर गाडगीळ - १६ नोव्हेंबरपर्यंत - १५ लाख ५४ हजार २८१.
- इस्लामपूर -जयंत पाटील - ८ लाख ४६८ रुपये,निशिकांत पाटील - ८ लाख ९६ हजार ५७१ (दोघेही १२ नोव्हेंबरपर्यंत).
- शिराळा-सत्यजित देशमुख - १९ लाख ९५ हजार १६७,मानसिंगराव नाईक - १७ लाख ४४ हजार ५०० (दोघेही १६ नोव्हेंबरपर्यंत).
- मिरज -सुरेश खाडे - १५ लाख ८५ हजार ६३४,तानाजी सातपुते - १५ लाख ९४ हजार ४९६. (दोघेही १६ नोव्हेंबरपर्यंत)
अमित शाह यांचा खर्च सुरेश खाडे यांच्या खात्यातभाजप महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे व संजय पाटील यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा सांगलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर ८ नोव्हेंबर रोजी झाली. या सभेचा ४ लाख ८९ हजार ९३२ रुपयांचा खर्च मिरजेतील उमेदवार सुरेश खाडे यांच्या हिशेबात धरण्यात आला आहे.
हेलिकॉप्टर्सचा खर्च पक्षाच्या खात्यातनिवडणुकीत प्रचारासाठी तब्बल ७५ हेलिकॉप्टर्स जिल्ह्यात विविध ठिकाणी उतरली. त्यांचा खर्च पक्षाच्या हिशेबात गृहीत धरण्यात आला. तेथील सभेचा खर्च मात्र संबंधित उमेदवाराच्या नावे पडला आहे.
सर्वच मतदारसंघांतील उमेदवारांचा निवडणूक खर्च मर्यादेतच आहे. निकाल लागल्यापासून २५ दिवसांपर्यंत खर्चाचा ताळमेळ सादर करण्यासाठी उमेदवारांना मुदत आहे. -डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी