शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

खानापूर मतदारसंघात साखर कारखान्यांच्या धुराड्याचा मुद्दा तापला, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातच मतभेद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2024 6:22 PM

संदीप माने खानापूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी खानापूर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ...

संदीप मानेखानापूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी खानापूर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात आटपाडीच्या माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे धुराडे मीच पेटवणार असे ठासून सांगितले. त्यामुळे खानापूर मतदारसंघातील बंद कारखान्यांच्या धुराड्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे.खानापूर मतदारसंघामध्ये आटपाडीचा माणगंगा व नागेवाडीचा यशवंत हे दोन सहकार क्षेत्रातले साखर कारखाने स्थापन करण्यात आले होते. खानापूरचे माजी आमदार संपतराव माने यांनी नागेवाडीच्या माळरानावर यशवंत सहकारी साखर कारखाना व आटपाडीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब देशमुख यांनी आटपाडीच्या फोंड्या माळावर माणगंगा सहकारी साखर कारखाना उभारला. पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष व उसाची कमतरता असतानाही हे कारखाने चांगल्या स्थितीमध्ये चालवून कर्जमुक्त करण्यात आले. मात्र, त्यानंतर दुष्काळी भागामुळे उसाची प्रचंड कमतरता, बेसुमार कामगार भरती व कारखान्यातील राजकारण यामुळे या कारखान्यावरील कर्जाचा बोजा वाढत जाऊन या कारखान्यांची धुराडी बंद पडली.खानापूर व आटपाडी तालुक्यातील लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारे हे दोन कारखाने काही वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. या भागामध्ये पाण्याची टंचाई असल्याने ऊस क्षेत्र कमी होते. त्यामुळे कारखान्यांचा मुद्दा मागील निवडणुकांमध्ये फारसा पटलावर आला नाही. मात्र, आता खानापूर व आटपाडी तालुक्यात टेंभूचे पाणी आले. यावर्षी प्रचंड पाऊस पडल्याने ऊस क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. हक्काचे कारखाने बंद असल्याने हा ऊस कुठे घालायचा, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. त्यामुळे शेतकरी याबाबत नेत्यांकडे विचारणा करू लागले आहेत.

माणगंगा कारखान्याचा मुद्दा ऐरणीवर..हाच मुद्दा पकडत सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आमदारकीपेक्षा माझ्यासाठी कारखाना महत्त्वाचा आहे. कोणत्याही परिस्थितीत माणगंगेचे धुराडे पेटवणारच, अशी घोषणा आटपाडी येथील देशमुख गटाच्या मेळाव्यात केली होती. हा कारखाना चालू करण्यासाठी सर्व नेत्यांना भेटणार असून, जो सहकार्य करील त्याच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. हाच धागा पकडत जयंत पाटील यांनी खानापुरात कारखान्याच्या धुराड्याच्या मुद्याला हवा दिल्याने खानापूर मतदारसंघाचे राजकारण तापले आहे.

धुराड्यावर करेक्ट कार्यक्रमखानापूर मतदारसंघामध्ये शिंदेसेनेकडून सुहास बाबर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वैभव पाटील व अपक्ष राजेंद्रअण्णा देशमुख रिंगणात आहेत. ‘यशवंत’ कारखान्यावर बाबर गटाची सत्ता होती. माणगंगेवर देशमुख गटाची सत्ता होती. त्यामुळे धुराड्याच्या मुद्यावरून जयंत पाटील कुणाचा करेक्ट कार्यक्रम करतात की विरोधक त्यांचा डाव हाणून पाडतात, हे मतमोजणीनंतरच समजणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४khanapur-acखानापूरSugar factoryसाखर कारखानेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024