शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

उद्धवसेनेला सांगली जिल्ह्यात एक जागा मिळण्याची शक्यता; मात्र, 'या' जागेबाबत अद्याप आशा

By घनशाम नवाथे | Published: October 24, 2024 7:12 PM

उद्धव ठाकरे भेटीत केवळ आश्वासन ..

सांगली : लोकसभेत थेट सांगलीत येऊन उमेदवारीची घोषणा करून उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली होती. परंतु, विधानसभेला आठपैकी एकही मतदारसंघ उध्दवसेनेला अद्याप मिळाला नाही. खानापूर आणि मिरजपैकी एक जागा पदरात पाडून घेण्यासाठी पदाधिकारी व इच्छुक उमेदवार प्रयत्नशील दिसतात. महाआघाडीतून मिरजेची जागा मिळण्याची सध्या तरी शक्यता निर्माण झाली आहे.दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी जिल्ह्यात विधानसभेला शिवसेनेचा भगवा दोनवेळा फडकवला. पक्षफुटीनंतर ते शिंदेसेनेत डेरेदाखल झाले. उद्धवसेनेत जिल्ह्यातील बरीच जुनी मंडळी कार्यरत आहेत. लोकसभेला सांगलीच्या जागेवर दावा करत थेट उद्धव ठाकरे यांनी मिरजेत येऊन घोषणा केली. जागा पदरात पाडून घेतली. त्यामुळे येथे संघर्ष झाला. जागा मिळवली तरी अपक्ष राहून विशाल पाटील व समर्थकांनी खरी जागा काँग्रेसचीच होती, हे दाखवून दिले.

उद्धव ठाकरे भेटीत केवळ आश्वासन ..लोकसभेत जागा मिळवण्यात उद्धवसेनेने बाजी मारली, तरी यंदा विधानसभेला आठपैकी एक जागा पदरात पाडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. निवडून येण्याच्या क्षमतेचा विचार केला जात असल्यामुळे अद्याप उद्धवसेनेला एकही जागा जिल्ह्यात मिळवता आली नाही. पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेत सुरुवातीला सांगली, मिरज आणि खानापूर मतदारसंघांवरील दावा सोडू नये, अशी मागणी केली. खासदार राऊत यांनी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

पक्षाला ताकद मिळणार काय?लोकसभेला जागा मिळवण्यात बाजी मारली तरी विधानसभेला आठपैकी एकतरी जागा मिळेल की नाही, हे निश्चित सांगता येत नाही. परंतु, उद्धवसेनेची जिल्ह्यात ताकद टिकवून ठेवण्यासाठी जागा आवश्यक असल्यामुळे पदाधिकारी अद्याप आशावादी आहेत.

शिंदेसेनेची खानापूरमधून उमेदवारी..जिल्ह्यात महायुतीतून शिंदेसेनेने खानापूर आटपाडीतून दिवंगत नेते अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर करत बाजी मारली आहे. मात्र, खानापूरला उद्धवसेनेला जागा मिळण्याची आशा मावळत चालली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना