सांगली : राज्य सरकारने अर्थसंकल्पात ताकारी, म्हैसाळ योजनेसाठी ४५० कोटी आणि टेंभू योजनेसाठी १५४ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या निधीतून खानापूर, आटपाडी आणि जत तालुक्यातील विस्तारित योजनांची कामे मार्गी लागणार आहेत.राज्य शासनाने अर्थसंकल्पात टेंभू आणि कृष्णा कोयना प्रकल्पास निधीची तरतूद केल्यामुळे अपूर्ण कामांना गती मिळणार आहे. टेंभू योजनेमध्ये नव्याने १८ गावांचा समावेश झाला आहे. या गावांना पाणी देण्यासाठीही अर्थसंकल्पातील निधीचा फायदा होणार आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार टेंभू योजनेत १८ गावांचा समावेश असून त्याची कामे तातडीने सुरू करण्यात येणार आहेत.
तसेच काही उपकालव्यांची अपूर्ण कामेही पूर्ण करण्यात येतील. ताकारी, म्हैसाळ मूळ योजनेबरोबर सुधारित म्हैसाळ योजनेसाठी ४५० कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद आहे. या कामाच्याही निविदा प्रसिद्ध झाल्या असून त्याचीही कामे करणार आहेत, असे सांगण्यात आले. यामुळे सिंचन योजनांची अपूर्ण कामे मार्गी लागणार आहेत.खानापूर, आटपाडी तालुक्याला फायदाखानापूर आणि आटपाडी तालुक्यातील अनेक गावे टेंभू योजनेपासून वंचित राहिली होती. या गावांचा याेजनेत समावेश व्हावा, यासाठी सामाजिक संघटनांसह नेत्यांनी रेटा लावला होता.यामुळे टेंभू योजनेत नव्याने १८ गावांचा समावेश झाला आहे. या गावांना पाणी देण्यासाठी १५४ कोटींचा निधी खर्च होणार आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. अपूर्ण कामेही पूर्ण होणार आहेत.म्हैसाळ सुधारित योजनेला गतीसुधारित म्हैसाळ योजनेतून जत पूर्व भागातील ६५ गावांना पाणी देण्यात येणार आहे. या कामासाठी हजार कोटी रुपयांची निविदाही प्रसिद्ध झाली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातही कृष्णा-कोयना प्रकल्पासाठी ४५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीमधील बहुतांश निधी म्हैसाळ सुधारित योजनेसाठीचा आहे. यामुळे जत तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना दिलासा मिळाला आहे.