शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

Maharashtra Budget 2024: सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ सिंचन योजना चालणार सौर उर्जेवर, दीड हजार कोटींची तरतूद

By संतोष भिसे | Published: June 28, 2024 5:40 PM

थकबाकीची डोकेदुखी संपणार

सांगली : राज्यभरातील सिंचन योजना सौर उर्जेवर चालविण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली. त्याचा फायदा सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेलाही मिळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.म्हैसाळ योजना सौर उर्जेवर चालविण्याचा विचार गेल्या दशकभरापासून सुरु आहे. सध्या पाणी उपशाच्या वीजबिलापैकी ८१ टक्के हिस्सा शासन भरते, तर १९ टक्के वीजबिल लाभार्थी शेतकऱ्यांना भरावे लागते. प्रतिएकरी पाणीपट्टी वसूल करुन वीजबिलाची तरतूद केली जाते. पण पैसे भरण्यास शेतकरी टाळाटाळ करीत असल्याने थकबाकीचा डोंगर वाढत जातो. थकबाकी वसुलीसाठी महावितरणने यापूर्वी अनेकदा योजनेचा वीजपुरवठाही खंडित केला होता. सध्या गेल्या सात महिन्यांपासून सुरु असलेल्या उपशाचे वीजबील मात्र टंचाई निधीतून भागवले जाणार आहे.थकबाकीची डोकेदुखी निकाली काढण्यासाठी सौरउर्जेचा प्रस्ताव विविध स्तरांतून मांडला जात होता. मिरज-पंढरपूर रस्त्यावर दंडोबा डोंगररांगांवर पवनचक्क्या उभारण्याचा प्रस्तावही चर्चेत होता. आता अर्थसंकल्पातील घोषणेनुसार ही योजना सौर उर्जेवर चालवली जाणार असल्याने वीज थकबाकीचा प्रश्न निकाली निघणार आहे. योजनेच्या सहा मुख्य पंपगृहांसह सर्व संलग्न योजनांना सौरउर्जेतून वीज मिळेल. अतिरिक्त वीज महावितरणला विकून पैसेही मिळवता येतील.

किमान ३०० एकर जागेची आवश्यकतासौर उर्जा प्रकल्प उभारण्यासाठी किमान ३०० ते ४०० एकर जागेची आवश्यकता असेल. म्हैसाळमध्ये ३०० एकर गायरान उपलब्ध आहे. ते ग्रामपंचायतीकडून शासनाला घ्यावे लागेल. या जागेवर यापूर्वीही एकदा सौर उर्जा प्रकल्प उभारण्याविषयी ग्रामपंचायत आणि महावितरण यांच्यात चर्चा झाली होती, मात्र ती पुढे सरकली नाही. आता ही जागा म्हैसाळ सिंचन योजनेसाठी उपयोगात येऊ शकेल.

टॅग्स :Sangliसांगलीvidhan sabhaविधानसभाAjit Pawarअजित पवारFarmerशेतकरीWaterपाणी