शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
2
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
3
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
4
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
5
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
6
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
7
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
8
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
9
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
10
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
11
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
12
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन
13
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
14
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
15
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
16
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?
17
"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य
18
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
19
चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा
20
सुवर्णसंधी! ONGC मध्ये 2 हजारांहून अधिक अप्रेंटिस भरती, स्टायपेंड किती मिळणार? पाहा...

अलमट्टी धरणप्रश्नी महाराष्ट्राने भक्कमपणे बाजू मांडावी, सर्वपक्षीय कृती समितीने आमदार गाडगीळांना दिले निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 3:52 PM

जिल्ह्यातील सततची पुराची स्थिती व अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यानंतर त्यात होणारी वाढ याबाबतचा प्रश्न समितीने गाडगीळ यांच्यासमोर मांडला

सांगली : अलमट्टी धरणाची उंची कर्नाटकने वाढवू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने भक्कमपणे त्यांची बाजू मांडायला हवी. यासाठी सांगलीच्या आमदारांनी शासनाकडे आग्रह धरावा, अशी मागणी बुधवारी सर्वपक्षीय समितीने आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे केली.सांगलीतील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने सांगली विधानसभा क्षेत्राचे आमदार गाडगीळ यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी पुढाकार घेऊन निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील सततची पुराची स्थिती व अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यानंतर त्यात होणारी वाढ याबाबतचा प्रश्न समितीने गाडगीळ यांच्यासमोर मांडला. कर्नाटक सरकारने अतिरिक्त पाणीसाठा केल्याने सांगली, सातारा व कोल्हापूर या नदीपात्राच्या परिसरातील लोकांवर ओढवणारे महापुराचे संकट किती त्रासदायक होणार आहे, याबाबतचे मुद्दे यावेळी मांडण्यात आले.मागील वर्षभरात सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने धरण क्षेत्रात पावसाळ्यात होणारा पाणीसाठा पुराचे पाणी शहरात घुसण्याचे प्रमाण, अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमुळे वाढणारी पाणीपातळी याबाबत अभ्यास करून तयार केलेली आकडेवारी यावेळी आमदारांसमोर सादर करण्यात आली. आमदार या नात्याने या विषयात पुढाकार घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री व संबंधित विभागाच्या सचिवांसमवेत संयुक्त बैठक आयोजित करावी, याबाबत न्यायालयात सुरू असलेल्या विविध खटल्यांत राज्य शासनाच्या वतीने योग्य व भक्कम बाजू मांडण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.यावेळी सतीश साखळकर, विजयकुमार दिवाण, प्रदीप वायचळ, सतीश राजणे, उतम कांबळे, प्रशांत भोसले, तोहीद शेख, आनंद देसाई, डॉ. संजय पाटील, संजय कोरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांशी केली चर्चा

आमदार गाडगीळ यांनी याप्रश्नी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून याविषयात लक्ष घालून लवकरात लवकर बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन गाडगीळ यांनी दिले.

टॅग्स :Sangliसांगली