Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महाविकास आघाडीला धक्का! काँग्रेसच्या जयश्री पाटील यांची बंडखोरी कायम, तिरंगी लढत होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 04:33 PM2024-11-04T16:33:40+5:302024-11-04T16:38:56+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या जयश्री पाटील यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अर्ज माघार घेण्यासाठी आज अंतिम मुदत होती, सांगली विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. काँग्रेसच्या जयश्री पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून आज त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. यामुळे आता सांगली विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपाने सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. जयश्री पाटील निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या, पण त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. यामुळे पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या दोन दिवसापासून जयश्री पाटील यांना उमेदवारी माघारी घेण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केला. पण पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम होत्या. आज त्यांनी आपला अर्ज मागे घेतलेला नाही. यामुळे आता सांगली विधानसभेत महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत.
महायुतीला शिराळ्यात दिलासा
शिराळा विधानसभा मतदारसंघातही महायुतीच्या सम्राट महाडिक यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. भाजपाकडून सत्यजीत देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली, यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत अर्ज दाखल केला. दरम्यान, दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित सम्राट महाडिक यांची बैठक झाली. या बैठकीनंतर महाडिक अर्ज माघार घेणार असल्याचे जाहीर केले