काशी येथे जंगम मंडळाच्या महारुद्राभिषेक सोहळ्यात जगदगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींनी मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पंचाक्षर माहेश्वर पौराेहित्य मंडळाच्या वतीने काशी येथे विश्वेश्वराला महारुद्राभिषेक करण्यात आला. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रायगड, पुणे, मुंबई, नाशिक येथून पाचशेहून अधिक पुरोहित उपक्रमात सहभागी झाले. काशी पीठाचे जगदगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींनी आशीर्वचन दिले.
मंडळाने दरवर्षी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एकाला महारुद्राभिषेक करण्याची परंपरा जपली आहे. यंदा काशी विश्वेश्वराचा अभिषेक झाला. जगदगुरू डॉ. चंद्रशेखर महास्वामींनी रुद्राभिषेकाचे महत्त्व, गंगास्नानाचे महत्त्व, फलप्राप्ती आदींविषयी विवेचन केले. संपूर्ण जग लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी आशा व्यक्त केली. सोहळ्याचे नियोजन पांडुरंग जंगम, कुमार हिरेमठ, महेश स्वामी, प्रकाश जंगम, डॉ. आर.के. स्वामी, बबनराव कमाने, प्रमोद जंगम, रेवणनाथ जंगम, राजेंद्र जंगम, रामचंद्र जंगम, विश्वनाथ जंगम आदींनी केले.