सांगली : सांगली, इस्लामपूर बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीला १८ पैकी १७ जागा मिळाल्या असून एका जागेवर अपक्षाला संधी मिळाली आहे. विटा बाजार समितीमध्ये काँग्रेस, शिंदे गट शिवसेना आणि भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विजयानंतर नेत्यांसह कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.सांगली बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी सकाळपासून सुरू झाली. पहिला निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला. हमाल व तोलाईदार गटातून मारुती बाळासाहेब बंडगर विजय झाले. त्यानंतर लगेच व्यापार गटातून चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रशांत पाटील-मजलेकर विजयी झाले. पण, या ठिकाणी चेंबर ऑफ कॉमर्सचे दुसरे उमेदवार सुशील हडदरे यांचा पराभव झाला. या जागेवर अपक्ष उमेदवार वारद कडाप्पा यांचा विजय झाला. सोसायटी गटातील सर्व ११ आणि ग्रामपंचायत गटातील चार अशा १५ जागांवरही महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी झाले.
सांगली बाजार समितीचे विजयी उमेदवारसोसायटी गट सर्वसाधारण सुजय शिंदे, स्वप्निल शिंदे (जत), बापूसाहेब बुरसे, संग्राम पाटील, बाबगोंडा पाटील (मिरज), महेश पवार, रामचंद्र पाटील (कवठेमहांकाळ), महिला गट - शकुंतला बिराजदार (जत), कुसुम कोळेकर (कवठेमहांकाळ), ओबीसी - बाबासाहेब माळी (जत), भटक्या विमुक्त जाती जमाती- बिराप्पा शिंदे (जत), ग्रामपंचायत गट : आनंदराव नलवडे (मिरज), रावसाहेब पाटील (कवठेमहांकाळ) अनु. जाती- शशिकांत नागे (सांगली), आर्थिक दुर्बल गट रमेश पाटील (जत), हमाल-तोलाईदार : मारुती बंडगर, व्यापार गट : प्रशांत पाटील-मजलेकर (चेंबर ऑफ कॉमर्स), वारद कडाप्पा (अपक्ष).
इस्लामपुरात राष्ट्रवादी समर्थकांची बाजीइस्लामपूर बाजार समितीत : राष्ट्रवादी समर्थक १७ उमेदवार विजयी आणि हमाल गटातून विरोधी भाजप-सेना शेतकरी पॅनलचे एक उमेदवार विजयी झाले आहेत.
विट्यात सर्वपक्षीय युतीला सत्ताविटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), भाजप सत्ताधारी गटाचे सर्व १८ उमेदवार विजयी झाले आहेत. कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.