शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

ना होणार चोरी, ना लागेल आता एअर बंच केबलमधून वीजपुरवठा; महावितरणचा प्रकल्प

By संतोष भिसे | Published: December 23, 2023 2:01 PM

एअर बंच केबलचे फायदे..जाणून घ्या

सांगली : महावितरणने आता एअर बंच केबलला प्राधान्य दिले आहे. वीजचोरीला आळा आणि विजेच्या धक्क्याने होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी या केबलचा वापर सुरू झाला आहे. भविष्यात जिल्हाभरात त्याचे जाळे पसरविण्याचे महावितरणचे नियोजन आहे.पहिल्या टप्प्यात कृषी जोडण्यांसाठी ही केबल वापरण्यात येत असून, भविष्यात निवासी वसाहतींमध्येही वापर होणार आहे. सध्या विजेच्या खांबांवर तीन फेजच्या तारा दिसून येतात. त्याऐवजी तीनही फेज एकत्र असलेली केबल वापरण्यात येत आहे. त्यावर जाड कोटिंग असते. त्यामुळे आकडा टाकून चोरी करता येत नाही. चोरून वीज घेण्यासाठी केबलचे आवरण काढण्याचा प्रयत्न केला, तर शॉर्ट सर्किट होऊ शकते. त्यामुळे सध्या कृषी जोडण्यांसाठी तिचा वापर प्राधान्याने सुरू आहे. प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरद्वारे वीजपुरवठ्याचा प्रकल्प राबविला जात आहे. त्यासाठी एअर बंच केबल प्राधान्याने वापरण्यात येत आहे. ऑगस्ट २०२३ पर्यंत अनामत भरलेल्या शेतकऱ्यांना या केबलद्वारे वीज पुरविली जाणार आहे.भविष्यात जिल्हाभरात निवासी वसाहतींमध्येही या केबलद्वारे वीज पुरविली जाईल. त्यामुळे रस्तोरस्ती लोंबकळणाऱ्या तारा आता दिसणार नाहीत. त्याऐवजी एकच जाड केबल दिसेल. ज्या भागात विजेची चोरी होते, तेथे प्राधान्य दिले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही प्रक्रिया सध्या निविदा स्तरावर आहे.

गर्द झाडी असलेल्या भागात फांद्या तारांना घासल्याने शॉर्ट सर्किट किंवा अन्य दुर्घटना होतात. त्या टाळण्यासाठी फांद्या किंवा झाडे तोडावी लागतात. एअर बंच केबलमुळे वृक्षतोड करावी लागणार नाही. सध्या हरीपूर (ता. मिरज) येथे गर्द झाडीच्या वसाहतींत उघड्या वीजवाहिन्यांऐवजी एअर बंद केबलचे महावितरणचे नियोजन आहे.

एअर बंच केबलचे फायदे

  • आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही.
  • विजेच्या धक्क्याने माकड किंवा अन्य प्राणी मरण्याच्या दुर्घटनांना आळा.
  • केबल तुटून रानात पडली तरी शॉक लागण्याची शक्यता कमी.
  • वीजचोरी घटल्याने भारनियमनालाही आळा.
  • तार तुटून ऊस किंवा अन्य पिके जळण्याच्या दुर्घटनांना आळा.

सध्या कृषी जोडण्यांसाठी एअर बंच केबलचा वापर केला जात आहे. भविष्यात निवासी वसाहतींमध्येही वापर होणार आहे. वीजचोऱ्यांचे प्रमाण जास्त असलेल्या भागात प्राधान्याने ती वापरली जाईल. - सौरभ माळी, कार्यकारी अभियंता, महावितरण, सांगली ग्रामीण

टॅग्स :Sangliसांगलीmahavitaranमहावितरणelectricityवीज