रेठरे हरणाक्ष (ता.वाळवा) येथे रक्तदान शिबिर प्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, डॉ. बी. एस. गिरीगोसावी, जगन्नाथ मोरे-पाटील, कुमार कांबळे, डॉ. चेतन मोकाशी, बाळासाहेब कांबळे, चंद्रशेखर मोरे, डी. के. मोरे व सचिन पवार उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : ‘लोकमत’ चे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’, राजारामबापू पाटील ब्लड बँक, पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था व चौंडेश्वरी महिला ज्येष्ठ नागरिक संघटना यांचे वतीने रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे आयोजित रक्तदान शिबिरात ४५ जणांनी रक्तदान केले.
येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. गिरीगोसावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन मोकाशी, सरपंच कुमार कांबळे, पोलीस पाटील सुखदेव वाकळे यांच्या हस्ते करण्यात आले.
अर्थक्रांतीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे-पाटील, समाजसेवक बाळासाहेब कांबळे, पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष डी. के. मोरे, सचिव चंद्रशेखर मोरे, खजिनदार निवास शिंदे यांनी उत्कृष्ट संयोजन केले. धनाजी सावंत, दिवाकर मोरे, भास्कर मोरे, प्रा. अनिल सत्रे, बाळासाहेब मदने, किसन सावंत, दीपक गुरव यांचे विशेष सहकार्य लाभले.
चाैकट
यांनी केले रक्तदान
अभियंता अविनाश मोरे, प्रा. अनिल सत्रे, प्रवीण बिरमुळे, अनिल मोरे, किरण माने, प्रीतम शिंदे, सनी मोरे, मानसिंग ठोंबरे, जयवंत सूर्यवंशी, भोलाजी सत्रे, अतुल तांदळे, अभिषेक पवार, प्रवीण शिंदे, नितीन मोरे, श्रीपाद मोरे, धीरज मदने, श्याम पोतदार, अनिकेत मदने, रविराज मोरे, पंजाबराव जाधव, रामराव मोरे, सुरेश शिंदे, साहील आंबेकरी, सुमित पवार, सुशांत सत्रे, संग्राम पवार, तुषार कदम, अतुल मोरे, ऋषिकेश मोरे, रघुनाथ शिंदे, दिवाकर मोरे, सागर सव्वाशे, पंडित शिंदे, निलेश मोरे, सिकंदर संदे, राहुल मोरे, प्रदीप लाड, ओमकार मोरे, सागर मोरे, साईप्रसाद पवार, मनिष पवार, अमोल पवार, शशिकांत शिंदे, रियाज संदे, वैभव पाटील,
कोट
ज्येष्ठ नागरिकांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ‘लोकमत’ च्या रक्तदान शिबिराचे आयोजन करून आमच्या सर्व तरुणांच्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि वडीलधारी मंडळींचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
प्रा. अनिल सत्रे, रक्तदाता, रेठरे हरणाक्ष