सांगली : जिल्ह्यातील आटपाडी, विटा, तासगाव, जत या ठिकाणी मका, ज्वारी खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. शेतकऱ्यांनी दि. ३० एप्रिल २०२१ पर्यंत धान्याची ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी दिलीप पाटील यांनी केले आहे.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला आधारभूत किंमत मिळाली पाहिजे. यासाठी राज्य शासनाने मका, ज्वारी हा शेतमाल आधारभूत किमतीने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी दि. ९ एप्रिलपासून जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार ऑनलाइन नोंदणी सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतकऱ्यांनी ज्वारी आणि मका विक्री करायचा असेल तर आटपाडी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती, विटा येथे तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, तासगाव येथे ॲड. आर. आर. पाटील खरेदी-विक्री संघ, जत येथील विष्णूअण्णा खरेदी-विक्री संघ येथे संपर्क साधावा. त्यापूर्वी शेतकऱ्यांनी दि. ३० एप्रिलपर्यंत मका, ज्वारी विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.