शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

होळी लहान करा; पोळी दान करा..

By admin | Published: March 11, 2017 10:18 PM

‘अंनिस’चे पर्यावरणपूरक होळीचे आवाहन

सातारा : ‘होळी लहान करा, पोळी दान करा’ असे स्पष्ट करीत राज्यात होळीचा सण साजरा करताना पर्यावरणपूरक करावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र ‘अंनिस’तर्फे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर आणि प्रधान सचिव प्रशांत पोतदार यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्यभारत येत्या रविवारी होळीचा सण साजरा केला जाणार आहे. होळीच्या सणामध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाण नेवैद्य म्हणून पुरणाची पोळी दिली जाते. एका बाजूला समजामध्ये मोठ्या प्रमाणात कुपोषण आणि गरिबी असताना अत्यंत पौष्टिक अन्न असलेली पुरणाची पोळी ही होळीमध्ये टाकण्याऐवजी ज्यांना पुरणपोळी मिळू शकणार नाही. अशा कुटुंबाना पोळी दान करून होळीचा सण साजरा करावा.होळीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लाकूडतोड करून लाकडे जाळली जातात. त्यामधून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होते. तसेच होळीच्या निमित्ताने वापरल्या जाणाऱ्या अपशाब्दातून अनेक ठिकाणी तंटे निर्माण होतात. याला पर्याय म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकार यांच्या कल्पक नेतृत्वातून साकारलेला पर्यावरणपूरक होळीचा उपक्रम ‘अंनिस’ गेली अनेक वर्षे राज्यभर राबवत आहे. पर्यावरणाच्या वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर लोकांनी पर्यवरणपूरक होळी साजरी करून त्याला पोळी दान करण्याची जोड द्यावी, असे आवाहन पत्रकात करण्यात आले. आहे. (प्रतिनिधी) साताऱ्यात दोन ठिकाणी उपक्रम...महाराष्ट्र ‘अंनिस’च्या सातारा शाखेच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक होळीचे आयोजन केले जाणार आहे. साताऱ्यातील प्रतापसिंहनगर आणि लक्ष्मी टेकडी परिसरात पर्यावरणपूरक होळी आणि ‘होळी लहान करा.. पोळी दान करा’ या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे. वंदना माने, योगेश जगताप, भगवान रणदिवे यांनी या आयोजनात पुढाकार घेतलेला आहे. नागरिकांनी त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘अंनिस’तर्फे करण्यात आलेले आहे.