शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

माणगंगा कारखाना निवडणूक बिनविरोध, तब्बल ३७ वर्षांनंतर सत्तांतर; शिवसेनेच्या तानाजी पाटील गटाकडे सत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2023 12:21 PM

भाजपचे नेते, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख व त्यांचे बंधू अमरसिंह देशमुख यांच्या माघारीच्या नाट्यमय घडामोडींमुळे राजकारणात खळबळ

आटपाडी : येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्यात तब्बल ३७ वर्षांनंतर सत्तांतर झाले. कारखान्यात प्रथमच लढणाऱ्या शिवसेनेच्या तानाजी पाटील गटाची बिनविरोध सत्ता आली. सांगोल्यातील शेकापचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पाटील यांना बिनशर्त पाठिंबा देत माघार घेतल्याने सत्ताधारी राजेंद्रअण्णा देशमुख गटानेही सर्व अर्ज माघारी घेण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला.शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातील जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांचे सर्व १७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपचे नेते, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख व त्यांचे बंधू अमरसिंह देशमुख यांच्या माघारीच्या नाट्यमय घडामोडींमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.माणगंगा साखर कारखाना कर्जापोटी जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. त्याची निवडणूक प्रक्रिया पंधरा दिवसांपासून सुरू होती. बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत अनेक खलबते झाली. सत्ताधारी गटाकडून सांगोला तालुक्यामधून शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वतीने दाखल केलेले अर्ज सुरुवातीलाच मागे घेत पाटील गटाला बिनशर्त पाठिंबा देण्यात आला. सांगोला तालुक्यात सुमारे चार हजार मतदान असून, तेथील अर्ज मागे घेतल्यानंतर आटपाडीच्या देशमुखांनीही माघार घेत निवडणूक बिनविरोध केली.यावेळी तानाजी पाटील म्हणाले की, कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याचे आम्हाला उशिरा कळाले. त्यामुळे अर्ज भरताना अडचणी आल्या. बिनविरोधसाठी सत्ताधारी गटाकडून प्रस्ताव आला होता. वरिष्ठ नेत्यांकडून दबावतंत्र वापरण्यात आले. मात्र, आम्ही निवडणूक लढवण्यावर ठाम होतो. साखर कारखाना खासगी होण्याच्या मार्गावर असून, तो सभासदांचा राहावा, यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचा विश्वास आम्ही नेत्यांना दिला. हीच भूमिका दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे मांडली असता त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला.अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेनंतर पाटील यांनी कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारची आतषबाजी व गुलालाची उधळण न करण्याच्या सूचना दिल्या.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेBJPभाजपाShiv Senaशिवसेना