फोटो ओळ : दुधोंडी (ता. पलूस) येथे मानसिंग बँकेच्या सभेत जे. के. बापू जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुधीर जाधव, शीतल सावळवाडे आदी उपस्थित होते.
दुधोंडी : मानसिंग बँक सभासदांच्या विश्वासास पात्र असणारी बँक आहे. बँकेने नेहमी सभासद, ठेवीदार व कर्जदार यांचे हित जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन बँकेचे संस्थापक जे. के. बापू जाधव यांनी केले.
दुधोंडी (ता. पलूस) येथे मानसिंग बँकेच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव होते.
जे .के .बापू जाधव म्हणाले की, कोरोनाचे महासंकट असतानासुध्दा बँकेला ९८ लाख ५० हजारांचा नफा मिळाला आहे. ते केवळ बँकेला लाभलेले तज्ज्ञ व कुशल संचालक मंडळ व प्रामाणिक व नि:स्वार्थी भावनेने काम करणारा सेवक वर्ग यांच्यामुळे शक्य झाले.
सुधीर जाधव यांनी बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. बॅंकेच्या एकूण ठेवी १४९ कोटी, तर कर्जे ११० कोटी आहेत. दुधोंडी मुख्य शाखेत एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन, पासबुक प्रिटिंग मशीन, ग्राहकांना रुपे डेबिट कार्ड सुविधा दिल्या जात आहेत. सध्या बँकेच्या दुधोंडी, सांगली, पलूस, विटा व कराड येथे शाखा कार्यरत आहे.
मॅनेजर हणमंत महाडिक यांनी विषयपत्रिका वाचन केले. कुबेर पाटील यांनी प्रास्ताविक केले. बँकेचे शाखाधिकारी प्रकाश आरबुणे यांनी स्वागत केले. बँकेचे उपाध्यक्ष शीतल सावळवाडे यांनी आभार मानले.
यावेळी क्रांतिकुमार जाधव, उपाध्यक्ष शीतल सावळवडे, सरपंच विजय आरबुणे, जनरल मॅनेजर संभाजी जाधव, धनपाल खोत, प्रा. गुंडा खोत आदी उपस्थित होते.