पणुंब्रे तर्फ शिराळा येथे नुकसानीची पाहणी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाटेगाव : पणुंब्रे तर्फ शिराळा व घागरेवाडी (ता. शिराळा) येथे शनिवारी ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
शिराळा उत्तर भागातील पणुंब्रे तर्फ शिराळा, घागरेवाडी, मोंडेवाडी परिसरात गेल्या ७५ ते ८० वर्षांत असा पाऊस पाहिला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. ओढ्याला आलेले पाणी अनेक घरात घुसले. प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले. दोन्ही गावांतील प्रत्येकी एक असे दोन बंधारे फुटले आहेत. शेताचे बांध, ताली फुटल्या. याची आमदार नाईक यांनी पाहणी केली. यावेळी अध्यक्ष आनंदा चौगुले, माजी अध्यक्ष भास्कर घागरे, बी. एम. पाटील, सरपंच संगीता झेंडे, ग्रामपंचायत सदस्य संजय कदम, सुभाष घागरे, जयवंत चौगुले, माजी सरपंच प्रकाश पाटील, शिरीष पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष लालासाहेब पाटील, घागरेवाडीचे सरपंच उषा घागरे, पांडुरंग घागरे, शहाजी घागरे, सर्जेराव घागरे, अशोक घागरे, तुकाराम पाटील, ग्रामसेवक वंदना खोत उपस्थित होते.