शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सरकारची हिंदूंबाबत काय भूमिका आहे? परराष्ट्र सचिवांनी सांगितलं...
2
लाडकी बहीण योजनेसंदर्भात अदिती तटकरेंनी पत्रकच काढलं; म्हणाल्या, एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून...
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी; खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट!
4
प्रार्थनास्थळ कायद्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; अनेक याचिका दाखल, केंद्राचे उत्तर येणे बाकी
5
केंद्राने बांगलादेशी हिंदूंना भारतात...; CM ममतांची मोदी सरकारकडे मोठी मागणी
6
आता गव्हाचे दर कमी होणार, सरकारने स्टॉक लिमिटमध्ये केली घट!
7
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे 'ऑपरेशन लोटस'; नाना पटोलेंचा घणाघात
8
"माझ्या मुलाला खूप टॉर्चर केलं.."; अतुल सुभाषची आई पडली बेशुद्ध, वडिलांनी केले गंभीर आरोप
9
'सिंधिया इज लेडी किलर', कल्याण बॅनर्जींच्या टीकेनंतर सभागृहात गदारोळ, निलंबनाची मागणी
10
₹10000 लावले असते, तरी लखपती झाले असते! 1 चे 10 करणाऱ्या शेअरनं केवळ 2 वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
कोण होते तालिबानी मंत्री खलील रहमान हक्कानी? ज्यांचा मंत्रालयाबाहेर बॉम्बस्फोटात झाला मृत्यू
12
ब्लॅक, बोल्ड & ब्युटिफूल.. 'बबिता जी'! मुनमुन दत्ताच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर हवा...
13
INDW vs AUSW : सांगलीच्या पोरीने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास! स्मृती मंधानाचे शतक, 'हा' पराक्रम करणारी पहिलीच!
14
"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखड यांच्यावर निशाणा
15
घरातून ओढून नेलं अन् गळा... माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या! पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप
16
थकवा, मूड स्विंग्स... नाइट शिफ्टचा शरीरावर वाईट परिणाम; डॉक्टरांनी दिल्या ३ बेस्ट डाएट टिप्स
17
ST Bus: एसटीचा एक रुपयात १० लाखांचा विमा; जखमी प्रवाशाला किती मिळते मदत? जाणून घ्या...
18
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
19
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी
20
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'

मानसिंगराव नाईक यांनी घेतली अजित पवार यांची भेट, सांगली जिल्ह्यात राजकीय चर्चेस उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 7:30 PM

शिराळा, वाळवा तालुक्यात अस्वस्थता : अनेक राजकीय नेत्यांची मुंबईला धाव

शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेस उधाण आले आहे. मात्र आपली ही भेट राजकीय नसून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी होती, असा खुलासा त्यांनी केला आहे. या भेटीमुळे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमधील नेत्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिराळा व वाळवा तालुक्यातील काही नेत्यांनी मुंबईला धाव घेतली आहे.शिराळा विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी मुंबईत अजित पवार यांची सोमवारी भेट घेतली. यावरून अनेक राजकीय तर्कवितर्क सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालातून पराभूत नेते सावरलेले नाहीत. मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही. त्यामुळे सत्तेत आलेल्या पक्षाचे नेतेही अस्वस्थ आहेत. अशावेळी मानसिंगराव नाईक मुंबईत अजित पवार यांना भेटल्याने वेगळी चर्चा सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

नाईक व पवारांचा जुना स्नेहभाव..विधानसभा निवडणूक प्रचारात यावेळी मानसिंगराव नाईक यांना या मुद्यावरून बरीच टोलेबाजी सहन करावी लागली होती. पवार कुटुंबीय तसेच अजित पवार आणि मानसिंगराव नाईक यांच्यातील स्नेहभाव जुना आहे. आता पराभवानंतर त्यांनी अजितदादांची घेतलेली भेट त्यामुळेच अधिक चर्चेत आली. शिराळा मतदारसंघातील राजकारणात नवे वळण येणार आहे का ? याची चर्चा सुरू झाली आहे.

मी अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. मात्र, आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. निकालावेळी त्यांचा मला फोन आला होता. 'मुंबईत आल्यावर भेटा', असे ते म्हणाले होते. त्यामुळे मुंबईत गेल्यानंतर त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी मोठ्या प्रमाणात शिराळा मतदारसंघासाठी विकास निधी दिला आहे. त्यांचे अभिनंदन करणे यात कोणतेही राजकारण नाही. - मानसिंगराव नाईक, माजी आमदार

टॅग्स :Sangliसांगलीshirala-acशिराळाMansingrao Naikमानसिंगराव नाईकAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार