कवठेमहांकाळ : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे. अनेक नवीन तरुण चेहरे काँग्रेसच्या संपर्कात आहेत, अशी माहिती डॉ. विवेक गुरव यांनी दिली.
तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील काँग्रेसचे नेते डॉ. विवेक गुरव यांचा सक्सेस परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. गुरव बोलत होते. वैभव नरुटे यांनीही पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. नरुटे म्हणाले, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते भरकटलेल्या अवस्थेत आहेत. त्यांच्या निष्ठेला न्याय मिळत नाही. आमचे नेते, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात अशा कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली जाईल.
यावेळी प्रा. वासुदेव गुरव यांचाही सत्कार तानाजीराव शिंगाडे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी बळीराजा पार्टीचे प्रदेश महासचिव बाळासाहेब रास्ते, शिरढोणचे प्रदीप पाटील, स्वप्निल सकटे, दशरथ पवार उपस्थित होते.