शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

सांगलीत उद्या ‘मराठा क्रांती मोर्चा’चे वादळ घोंघावणार; जाणून घ्या आचारसंहिता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 5:43 PM

मोर्चाची तयारी पूर्ण; जिल्हाभर बैठका, प्रशासनाकडूनही नियोजन

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी रविवारी सांगलीतमराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक भागातून या मोर्चामध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या माेर्चात लाखो बांधव सहभागी होतील, असा दावा संयोजकांनी केला.रविवारी सांगलीत मराठा क्रांती मोर्चा होणार असल्याने तयारीला वेग आला आहे. त्यानुसार संपूर्ण जिल्हाभरातून येणाऱ्यांसाठी सुलभ पार्किंगची सोय करण्यात आली आहे. यासाठी आज मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा मार्गावर पाहणी केली. विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौक ते राम मंदिर चौक या परिसरात सर्वत्र ध्वनीिक्षेपकांसह इतर सुविधा केल्या जात आहेत. यातील कामे आता पूर्ण होत आली आहे.मराठा क्रांती मोर्चाला विविध स्तरांतून पाठिंबाही वाढत असून, संघटनांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष भेटून सक्रिय सहभाग घेत आहेत.शुक्रवारी पदाधिकाऱ्यांनी नियोजनाबाबत पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पद्माकर जगदाळे, महेश खराडे, डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, नितीन चव्हाण, मयूर पाटील, प्रशांत पवार, जयंत जाधव यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

या ठिकाणी पार्किंगची सोय

  • इस्लामपूर, शिराळा, वाळवा, आष्टाकडून येणाऱ्यांसाठी जुना बुधगाव रस्त्यावरील इदगाह मैदान, छत्रपती शिवाजी क्रीडांगण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण याठिकाणी सोय असेल.
  • तासगाव, पलूस, आटपाडी, विटा येथून येणाऱ्यांसाठी तात्यासाहेब मळा, लक्ष्मी मंदिर ते चिन्मय पार्क, मार्केट यार्ड परिसरात सोय असेल.
  • जत, कवठेमहांकाळ, मिरजकडून येणाऱ्या आंदोलकांसाठी आयटी पार्क, कांतीलाल शहा प्रशाला, चिंतामणी कॉलेज मैदान, वालचंद महाविद्यालय, भोकरे कॉलेज या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
  • जयसिंगपूर, कोल्हापूरकडून येणाऱ्यांसाठी राजमती शाळा मैदान, कल्पद्रूम मैदान, शंभर फुटी रस्ता परिसरात पार्किंग असेल.

या मार्गावरून जाईल मोर्चाविश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौकापासून सकाळी दहा वाजता मोर्चाला जिजाऊ वंदना करून सुरूवात होईल. या वेळी क्रांतीसिंहाच्या पुतळ्याला स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्याहस्ते पुष्पहार अपर्ण करण्यात येईल. यानंतर मोर्चा गेस्ट हाऊस, मार्केट यार्ड, कर्मवीर चौक मार्गे राममंदिर चौकात पोहोचणार आहे. या ठिकाणी केवळ चार तरुणांची मनोगते व्यक्त होतील.

रुग्णवाहिकेसह इतर सुविधामोर्चा सुरू असला तरी अत्यावश्यक सेवेवर परिणाम होणार नाही. मोर्चा कालावधीत सेवा रस्त्यांवरून रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे. संपूर्ण मोर्चा मार्गावर आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. अनेक सेवाभावी संघटनांकडून अल्पोपहाराचीही सोय करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता आजारी असलेल्या व्यक्तींनी काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

ही आहे मोर्चाची आचारसंहिता

  • मोर्चात स्वयंशिस्त पाळून स्वयंसेवक व पोलिसांना सहकार्य करावे.
  • मोर्चात कोणत्याही जातीधर्माविरोधात घोषणा देऊ नयेत, कोणी देणारही नाहीत याकडे लक्ष द्यावे.
  • मोर्चावेळी धक्काबुक्की न करता, गोंधळ न करता सहभागी व्हावे.
  • कोणत्याही प्रकारचे व्यसन न करता मोर्चात सहभागी व्हावे.
  • मोर्चाला येताना कुणीही हुल्लडबाजी करू नये, अधिक वेगाने वाहने चालवू नयेत.
  • मोर्चात सहभागी होताना मौल्यवान वस्तू, दागिने आणू नयेत. लहान मुलांची काळजी घ्यावी.
टॅग्स :SangliसांगलीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण