शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

आरक्षणासाठी निवडणुकीत नोटा वापरण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा, सांगलीत बैठक

By संतोष भिसे | Published: April 02, 2023 6:06 PM

 सांगलीत रविवारी मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली. यावेळी अजितराव घोरपडे, दिनकर पाटील, विजयसिंह महाडिक, डॉ. संजय पाटील आदी उपस्थित होते.

सांगली : मराठा समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीकडे सर्वच पक्षांचे दुर्लक्ष आहे. चालढकल करत फक्त मतपेटीसाठी वापर केला जात आहे. येत्या वर्षभरात आरक्षणासह अन्य प्रश्न सुटले नाहीत, तर निवडणुकीत मराठा समाज नोटाचा वापर करेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत देण्यात आला.

सांगलीत रविवारी मोर्चाची बैठक झाली. यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार दिनकर पाटील, विजयसिंह महाडिक, डॉ. संजय पाटील, अमृतराव सूर्यवंशी, राहुल पाटील, धनंजय वाघ, उमेश कुरळपकर, शंभूराज काटकर, सतीश साखळकर, विलास देसाई आदी उपस्थित होते. घोरपडे म्हणाले की, राजकीय नेतृत्वावर विश्वास ठेवून राहिल्यास मराठा समाजाची फसवणूक झाल्याविना राहणार नाही. आजवरचे अनुभव असेच आहेत.

आरक्षणामध्येही फसवणूकच झाली आहे. सर्वच पक्ष मराठ्यांचा वापर करुन घेतात, मतपेटी म्हणूनच पाहतात. समाजाच्या प्रश्नांबाबत कोणालाच गांभीर्य नाही, त्यामुळे पुन्हा एकदा ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. दिनकर पाटील म्हणाले, आरक्षणासह आजवरच्या सरकारच्या घोषणा तडीस गेलेल्या नाहीत. न्यायालयातही ताकदीने बाजू मांडली जात नाही. डॉ. संजय पाटील म्हणाले, मराठा तरुणांना बॅंकांकडून अर्थसहाय्यावेळीही अडवणूक केली जाते.

चर्चेत देसाई, महाडिक, साखळकर, श्रीरंग पाटील, बाबा सावंत, विश्वजीत पाटील, नितीन चव्हाण, धनंजय भिसे, विजय धुमाळ, जयराज बर्गे, महेश पाटील यांनीही भाग घेतला. यावेळी प्रशांत भोसले, सतीश भोसले, योगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

... तर नोटांचा वापरबैठकीत इशारा देण्यात आला की, आरक्षणासह सर्व प्रश्न वर्षभरात सोडवले नाहीत तर, राज्यभरातील मराठा समाज निवडणुकीत नोटा अधिकाराचा वापर करेल. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ताकद दाखवून देईल. ओबीसीप्रमाणे सवलती, विद्यार्थ्यांना शुल्कमाफी व वसतिगृहे आदी मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे ठरले.

बॅंकांकडून अडवणुकीबद्दल संतापअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजातील तरुणांना उद्योगांसाठी कर्जे दिली जातात. पण ती मंजूर करताना बॅंक स्तरावर अडवणूक केली जात असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. यामध्ये सरकारने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली.

 

टॅग्स :SangliसांगलीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा