ओळ : शिराळा एसटी आगारातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमात मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष विकास शहा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आगारप्रमुख विद्या कदम, ए. बी. घाेसारडे उपस्थित हाेते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : मराठी भाषा ही रांगडी, प्रेमळ अशी भाषा असून, देशाची अखंडता राखण्याचे महत्त्वपूर्ण काम करते. असे प्रतिपादन शिराळा तालुका मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष विकास शहा यांनी केले.
शिराळा एसटी आगारामार्फत शनिवारी मराठी दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आगारप्रमुख विद्या कदम अध्यक्षस्थानी होत्या.
विकास शहा म्हणाले, राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारे मराठी भाषा बोलली जाते. मराठी भाषेची संपन्नता यामधून दिसून येते.
यावेळी ए. बी. घोसारडे, ए. बी. उनदुर्गे, जयंत पाटील, संदीप चिकूर्डेकर, नितीन सूर्यवंशी, एस. व्ही. गावित आदी उपस्थित होते. संभाजी नलवडे यांनी स्वागत केले, तर आर. पी. कांबळे यांनी आभार मानले.