शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

जुन्या पेन्शनसाठी येत्या सोमवारी नागपूर अधिवेशनावर मोर्चा, सांगली जिल्ह्यातून हजारो शिक्षक सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 4:46 PM

मिरज : राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावू नका, जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह इतर मागण्यांसाठी सोमवार, दि. ११ ...

मिरज : राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावू नका, जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह इतर मागण्यांसाठी सोमवार, दि. ११ रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर शिक्षकांचा आक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातून जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे यांनी केले.नागपूर येथील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक समितीच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक मिरज येथे पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील, नेते किरण गायकवाड, हरिभाऊ गावडे, सदाशिव पाटील, आदी उपस्थित होते.उदय शिंदे म्हणाले, राज्यात प्राथमिक शिक्षकांच्या अनेक मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. कमी पटसंख्येच्या नावाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद अथवा समायोजित केले जात आहे. हा निर्णय चुकीचा आहे. शाळा समूह योजना रद्द करावी, दत्तक शाळा योजना रद्द करावी. रिक्त जागा त्वरित भराव्यात, कंत्राटी शिक्षक स्वयंसेवक पद्धत बंद करावी, यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे.राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील यांनी शिक्षक समिती ही राज्यातील सर्वांत बलाढ्य संघटना असून विद्यार्थी, शिक्षण, शिक्षक आणि समाज या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मोर्चाला उपस्थित राहावे, असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील म्हणाले, शिक्षकांना अतिरिक्त काम देण्यात येते. त्याचा ताण शिक्षकांवर येतो. त्यामुळे शिक्षकांचा मूळ उद्देशच बाजूला राहत आहे. हे शासनाने बंद करावे.या बैठकीला शिवाजी पवार, अण्णासाहेब जाधव, सतीश पाटील, शिवाजी पवार, यु. टी. जाधव, सतीश पाटील, सुनील गुरव, रमेश पाटील, नवनाथ पोळ, विकास चौगुले, काका कदम, आदी उपस्थित होते.

जुनी पेन्शनच्या पदाधिकाऱ्यांचा समितीमध्ये प्रवेश..तासगाव तालुका जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष महादेव जंगम, जिल्हा सरचिटणीस राहुल कोळी, संघटक मुरगेश पाटील यांच्यासह शिक्षकांनी शिक्षक समितीमध्ये प्रवेश केला. समितीचे राज्यनेते उदय शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.

टॅग्स :SangliसांगलीPensionनिवृत्ती वेतन