शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

माथाडी महामंडळाच्या मनमानी कारभाराविरोधात सांगलीत हमालांचा मोर्चा, माहिती लपवली जात असल्याचा आरोप 

By अशोक डोंबाळे | Published: October 13, 2023 5:08 PM

जिल्हाधिकाऱ्यांनी सव्वातीन कोटी देऊनही हमालांना वाटप नाही

सांगली : हमाल माथाडी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे. हमालांनी मागितलेली कोणतीही माहिती दिली जात नाही, असा आरोप करून हमालांनी सांगली मार्केट यार्डातील माथाडी महामंडळाच्या कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढून निदर्शने केली. दरम्यान, अधिकाऱ्यांनी यापुढे असे होणार नाही, सर्व माहिती दिली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हमालांनी आंदोलन मागे घेतले.जिल्हा हमाल पंचायतीचे विकास मगदुम, बाळासाहेब बंडगर, राघू बंडगर, संजय मोरे, प्रल्हाद व्हनमाने, बजरंग खुटाळे, किरण रूपनर, आदगोंडा गोंडाजे, खंडू सोनूर, दिगंबर तुपलोंढे, मारुती बंडगर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. माथाडी महामंडळातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या जात होत्या. तसेच माथाडी महामंडळाकडे १०० कोटींच्या ठेवी आहेत. या ठेवी जी बँक अधिकाऱ्यांना जास्त कमिशन देतात, त्यांच्याकडेच ठेवल्या जात आहेत, असा आरोप बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर यांनी केला.जिल्हाधिकारी यांनी रेशनिंगच्या हमालीची तीन कोटी ३१ लाख रुपयांची लेवी देऊनही त्याचे हमालांना वाटप झाले नाही. हमालांची हमाली व्यापाऱ्यांनी वेळेत भरली नाही तर संबंधीत व्यापाऱ्यास दंड आकारला जात आहे. पण, त्या दंडाच्या रकमेचा कुणालाही हिशेब दाखविला जात नाही, असाही आरोप बंडगर यांनी केला. दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी माथाडी मंडळाकडे अर्ज करून हमाल, तोलाईदार, महिला माथाडी कामगारांच्या नोंदणी माथाडी कामगारांच्या फंड, ग्रॅच्युईटी व इतर संबंधीत आर्थिक माहिती मागितली होती. परंतु, अधिकाऱ्यांनी माहिती दिली नाही, असेही बंडगर म्हणाले. म्हणूनच संतप्त झालेल्या हमाल व तोलाइदारांनी माथाडी महामंडळावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांचा निषेध केला.दरम्यान, माथाडी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी हमालांना गरजेची सर्व माहिती देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :Sangliसांगली