लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचा प्रारंभ झाला. पणन महामंडळ व विष्णूअण्णा संघातर्फे ‘नाफेड’साठी हरभरा खरेदी केला जाणार आहे. विष्णूअण्णा संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील यांच्याहस्ते उद्घाटन झाले. यावेळी पणन महामंडळाचे डी. आर. पाटील, शिवाजी पाटील, उपाध्यक्ष रमेश चौगुले, व्यवस्थापक सुभाष मस्कर, सूर्यकांत शिंदे, बाजार समितीचे सचिव एम. पी. चव्हाण, पर्यवेक्षक तानाजी पाटील आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी हरभरा जास्तीत जास्त विक्रीसाठी समितीत आणण्याचे आवाहन डी. आर. पाटील यांनी केले. त्यासाठी विष्णूआण्णा खरेदी-विक्री संघाकडे ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. शासनाने आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ५ हजार १०० रुपये निश्चित केली आहे. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील व सचिव एम. पी. चव्हाण यांनी केले.